मांडवा येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचा ६५वा महापरिनिर्वाण दिन साजरा

  39

  ?मांडवा येथे कोरोणा -१९ लसीकरणाबाबत जनजागृती व लसीकरण

  ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

  पुसद(दि.7डिसेंबर):-तालुक्यातील मांडवा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन ग्रामपंचायत कार्यालय व सम्यक संबोधी बुद्धविहार मांडवा येथे साजरा करण्यात आला .

  यावेळी सरपंच अल्का ढोले ,उपसरपंच विजय राठोड, सचिव एस.टी.तडसे, पोलीस पाटील दत्तराव पुलाते,तलाठी धनश्री आहाळे, डॉ. किरण वाठोरे, आरोग्य सेविका अर्चना लोधी,ग्रा.पं.सदस्य गोपाल मंदाडे, कमल राठोड, शालिनी धाड,संगिता गजभार, कविता आडे, जयश्री आबाळे, आरती पुलाते, जि.प. शाळा मांडवा मुख्यध्यापिका वृंदा डिगलवार ,शिक्षक अजय अनसाने,विनोद तायडे, कैलास भरगाडे,व सर्व शिक्षकवृंद ,अंगणवाडी शिक्षिका इंदुबाई ढोले,जयश्री घुक्से,मदतीनीस आशा सुरोशे, आशासेविका दिक्षा ढोले, देविका साखरे,आय.सी.आर.पी.दैवशाला डोळस,जयश्री मंदाडे, कृषी सखी ज्योती ढोले, पक्षुसखी पुनम साखरे,दुर्गा ग्रामसंघाच्या अध्यक्षा कालंदा घुक्से, उपाध्यक्ष कविता धाड, राघोजी ढोले, धर्मा राठोड, दगडुजी ढोले, साहेबराव ढोले,इत्यादी मान्यवरांनी तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

  त्यानंतर उपस्थितांनी गावामध्ये कोरोणा -१९ लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच ज्या नागरिकांना लसीकरणाच्या स्थळापर्यंत येणे शक्य नाही अशांना २० नागरिकांना घरी जाऊन लस देण्यात आली.आज रोजी कोविडशिल्ड लसचा पहिला व दुसरा डोज ८० नागरिकांना देण्यात आला.