रानबोथली येथे जागतिक स्त्री हिंसा विरोधी पंधरवडा ‘संविधान रुजवू माणूस घडवू’ कार्यक्रम संपन्न

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.7डिसेंबर):-दि. 5/12/2021 रोजी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा यांच्या वतीने ‘संविधान रुजवू माणूस घडवू’ या संकल्पनेतून 25 नोव्हें ते 10 दिसें असा जागतिक स्त्री हिंसा विरोधी पंधरवडा तसेच शेतकरी विरोधी UPOV(नवीन पीक वाण संरक्षणासाठी आंतराष्ट्रीय संघटना) निर्मित बियाण्यांबाबतच्या कायद्यासंदर्भात 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर ‘जागतिक कृती आठवडा जनजागृती कार्यक्रम जुनी जि. प. शाळा रानबोथली येथे घेण्यात आला. संस्था गेल्या 2006 पासून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या पंधरवडा दरम्यान विविध जनजागृती विषयी कार्यक्रम घेत असते.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संस्थापक डॉ. सतीशजी गोगुलवार, जि. प. शाळेचे शिक्षक जिवतोडे सर, संस्थेचे कार्यकर्ते गणेश हुलगे तसेच तन्मय भोयर, निवृत्ताताई तलमले,माजी सरपंच रानबोथली, हर्षा राऊत ग्राम संघ अध्यक्ष व गावातील सेंद्रिय शेतकरी मुकरु राऊत व खुशाल नाकतोडे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिज्ञा घेऊन झालेली असून मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. गोगुलवार यांनी एकूणच 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान असणाऱ्या दिवसांचा उहापोह करून देऊन त्यांचे महत्व सांगितले.

सोबतच संविधानात असणारे न्याय, समता, बंधुता व स्वतंत्रता या मूल्यांची जाणीव करत त्यांची आयुष्यातली गरज सांगितली. जिवतोडे सरांनी लहान मुलांमध्ये या मूल्यांची रुजवणूक करून आठवण करून दिली. गणेश हुलगे यांनी सुद्धा स्त्रियांवरील हिंसा या विषयावर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांमध्ये आजचे बियाण्याबाबतचे असणारे स्वातंत्र व जागतिक पातळीवर त्याबाबत असणारी राजनीति व कंपन्यांचे वर्चस्व या विषयासंदर्भात तन्मय भोयर यांनी शेतकऱ्यांमध्ये जाणीव करून दिली.

शेवटी सहभागींना स्त्री व पुरुष यांमधील असणारे नाते व पारंपरिक बियाण्यांचे महत्व पटवून देणारे व्हिडीओ प्रोजेक्टर वर दाखवण्यात आले. कार्यक्रमामध्ये एकूण 9 गावातील महिला व पुरुष उपस्थित होते. यामध्ये सर्वांना मास्क देण्यात आलेले असून सॅनिटाईझरचा वापर करून कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन संस्थेचे कार्यकर्ते रामदास मैंद व आभारप्रदर्शन वैशाली शेंडे यांनी केले.