आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना ‘गुरुगौरव पुरस्कार’ जाहीर.

    39

    ✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

    धरणगाव(दि.7डिसेंबर):- येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना ओ.बी.सी.शिक्षक असोशिएशन तर्फे दिला जाणारा “गुरुगौरव पुरस्कार – २०२१” जाहीर झाला आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओ.बी.सी. विद्यार्थी – शिक्षक – पालक विकास असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षी २८ नोव्हेंबर तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतीदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करित असते. या दिनाचे औचित्य साधून अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना “गुरुगौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येत असते.

    यावर्षी २८ उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कार देऊन दि. २५ डिसेंबर, २०२१ रोजी धुळे येथे गौरविण्यात येणार असल्याची माहिती ओ.बी.सी.शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी दिली आहे. या २८ पुरस्कारार्थींमध्ये महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना देखील “गुरुगौरव पुरस्कार – २०२१” जाहीर झाल्याने सर्व निकटवर्तीय व स्नेही मित्रांकडून अभिनंदन केले जात आहे.