प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न

    54

    ✒️अकोला(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    अकोला(दि.9डिसेंबर):-बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,अकोला जिल्ह्याच्या वतीने कोविड १९ चे लसीकरण शिबीर घेण्यात आले. सदर शिबीर संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष डॉ. संजय चव्हाण, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष संजय वाट यांच्या माध्यमातून जनुना येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये यशस्वी पार पडले.

    जिल्हा परिषद सदस्य श्री रायसिंग राठोड, सरपंच सेवा कैलास पवार, उपसरपंच रमेश राठोड व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे विशेष सहकार्य या शिबिरासाठी लाभले. पिंजर आरोग्य केंद्र अंतर्गत डॉ रहेमान खान, रेखा घनगाव ए. एन. एम. समाधान लोखंडे, एम. पी. डब्ल्यू अंगणवाडी सेविका दुर्गा राऊत, मदतनीस जयवंत पवार, आशा पुष्पा जाधव, आशा वनमाला चव्हाण, आरोग्य मदतनीस वच्‍छलाबाई राठोडया सर्वांच्या सहकार्याने जनुना गावामध्ये सकाळी १० ते सांय.६ वाजेपर्यंत लसीकरण शिबीर घेण्यात आले. जुनूना गावातील नागरिकांनी लसीकरणाला योग्य प्रतिसाद दिला.

    आजपर्यंतचे सर्वात मोठे लसीकरण म्हणून या शिबिराकडे पाहिले जात आहे. १८८ नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. गावातील नायक विजय पवार, नायक बळीराम राठोड व सामाजिक कार्यकर्ता विकास पवार डॉक्टरची टीम, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष डॉ संजय चव्हाण यांनी विशेष आभार मानले.अकोला जिल्हाध्यक्ष डॉ. संजय चव्हाण व जिल्हा कार्यकारिणीने लसीकरण शिबीर यशस्वी पार पाडल्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य,विभाग, जिल्हा व सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी संघाच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीचे कौतुक केले आहे.