जि प उ प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येशील उपक्रम- प्रत्यक्ष मोबाईल EVM ने पार पडली शालेय बालपंचायत/शालेय मंञीमंडळ निवडणूक

26

✒️नितीन रामटेके(गोंडपीपरी प्रतिनिधी)

गोंडपीपरी(दि.9डिसेंबर):-मँजिक बस इंडीया फाउंडेशन चंद्रपूरच्या सहकार्याने जि.प.उच्च प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथील शालेय विद्यार्थ्यांना देशातील होणाऱ्या निवडणूक प्रक्रीयेची माहिती देण्यासाठी शाळेत शालेय बालपंचायत तथा शालेय मंञिमंडळाची निवडणूक घेण्यात आली.याप्रसंगी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रीयेतील संपूर्ण प्रक्रीया रितसर समजावून सांगण्यात आली.आणि त्यानुसार निवडणूकीची अधीसुचना जारी करणे,फार्म भरणे,आक्षेप घेणे, माघार घेणे, चिन्ह वाटप करणे, प्रचार करणे, मतमोजणी या सा-या क्रिया कृतीद्वारे करुन दाखविण्यात आल्या.

प्रत्यक्ष मोबाईल EVMद्वारे मतदान घेण्यात आले.त्यानंतर मतमोजणी घेण्यात आली. मतदान निकाल घोषीत करण्यात आला. प्राप्त मतदानानुसार अधिककडून कमीकडे जात मंञीमंडळ स्थापन करुन पदे निश्चीत करण्यात आली.विजेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक *विठ्ठल गोंडे ,रवींद्र उमरे, गणेश गेडाम,गीतांजली चौधरी* यांनी मतदान अधिकारी म्हणून कार्य पार पाडले.शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.गौतम उराडे सर यांनी केंद्राध्यक्षाची भूमिका पार पाडली.

संपूर्ण प्रक्रिया पार पाडतांना कोरोनाच्या नियमाचे रितसर पालन केल्या गेले. अत्यंत शांततेत प्रक्रीया पार पाडण्यात आली.निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी गौतम उराडे, विठ्ठल गोंडे,रविंद्र उमरे,गणेश गेडाम, गीतांजली चौधरी मॅडम, मँजीक बस इंडीया फाउंडेशन शिक्षक, मा.दुर्गे सर, प्रमोद दुर्गे यांनी अथक परीश्रम घेतले. सर्व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम मोठ्या मनोरंजकतेने आणि कुतुहलाने पार पाडला. मुख्यमंत्री म्हणून अथर्व प्रमोद दुर्गे यांची निवळ करण्यात आली तर उपमुख्यमंत्री म्हणून समिक्षा श्रीकृष्ण विद्ये हिची निवळ करण्यात आली.