चिंचोली येथे महिला ग्राम संघ कार्यालयाचे जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम सरांच्या हस्ते उदघाटन

31

🔸3 लाख समुदाय निधी व 50 हजार व्हीआरएफ निधी महिलांना वाटप

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.9डिसेंबर):-आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मुळावा जिल्हा परिषद गटातील चिंचोली (संगम) येथे क्रांतीविकास महिला ग्राम संघाच्या कार्यालयाचे उदघाटन व गावातील 18 महिला समुहाच्या सदस्यांना 3 लाख रुपयांचा समुदाय गुंतवणुक निधी(CIF)व 50 हजार रुपयांचा जोखीम प्रवर्ग निधी(VRF) जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन पंचायत समिती सदस्य गजानन सोळंके, ग्राम पंचायत सरपंच पद्माकर पुंडे, उपसरपंच बंडुभाऊ चिंचोलकर, ग्रा.प. सदस्य राजु सुर्य, सुमेध नवसागरे ,ग्रामसेवक भगत साहेब,तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवकुमार चिंचोलकर, गावातील जेष्ठ नागरिक गंगाधरराव कळलावे,शंकरराव चिंचोलकर उपस्थित होते.

याप्रसंगी अभियानातील निधी विषयी चितांगराव कदम सर व रामदास इटकरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम संघ अध्यक्षा संगीता नवसागरे,सचिव आशा चिंचोलकर, कोषाध्यक्ष अश्विनी चिंचोलकर, लिपिका विक्रांती चिंचोलकर यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे संचालन समुह संसाधन व्यक्ती(ICRP) ज्योती विनायक ढोले यांनी केले तर प्रास्ताविक व आभार उमेद अभियानांतर्गत महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या मुळावा प्रभाग समन्वयक माधुरी दळवी यांनी मानले.यावेळी गावातील सर्व समुहाच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.