भैरव सामाजिक प्रतिष्ठान मार्फत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

    70

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.10डिसेंबर):-लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती १२ डिसेंबर रोजी असून त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून भैरव सामाजिक प्रतिष्ठान ने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या विचारांची उंची पाहिली तर ती हिमालयासरखी आहे.कर्तुत्व आणि नेतृत्व सुद्धा फार मोठ्या उंचीचे होते.नाथरा ता.परळी येथून हे नेतृत्व जन्माला आले आणि देशाच्या राजधानीत जाऊन केंद्रीय ग्रामविकास मंत्री बनले.हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता तरी सुद्धा त्यांनी ते जमावलेच.ते ज्या पदावर गेले त्या पदाला न्याय देण्याचे काम लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री झाल्यावर महाराष्ट्र राज्य दहशद मुक्त करण्याचे काम मुंडे साहेबांच्या हातून झाल्याचे आपण पाहिले आहे.

    त्यांचे कार्य सामाजिक,राजकीय,आर्थिक व शैक्षणिक या सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण राहिले आहे.अगदी याच विचारावर पाऊल ठेवून भैरव सामाजिक प्रतिष्ठान ने कार्य हाती घेऊन समाजातील दीनदलित,गोरगरीब,आदिवासी,वंचित घटकासाठी मदत करून भैरव सामाजिक प्रतिष्ठान लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती साजरी करणार आहे.अशाप्रकारे मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा चालवण्याचे काम भैरव सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे असे शेवटी भैरव भोसले यांनी म्हटले.