ईम्पॅरीकल डाटा मिळेपर्यंत अखंड घरणे आंदोलनाचा निर्धार

    41

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.10डिसेंबर):-ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने थांबवले आहे. भविष्यात शैक्षणीक, नोकरीतील आरक्षणही संपण्याची भिती निर्माण झालेली आहे. यामागे ‘ईम्पॅरीकल डाटा’ ही सर्वात महत्त्वाची बाब असून तो लवकरात लवकर ऊपलब्ध करून द्यावा यासाठी गंगाखेड तालुक्यातील ओबीसींनी एल्गार पुकारला आहे. हा डाटा न्यायालयास ऊपलब्ध करून दिला जात नाही, तो पर्यंत अखंड धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

    आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या आंदोलनाची घोषणा करण्यात आली. ओबीसींच्या सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसील आणि पोलीस प्रशासनास निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केलेले नाही. तर ईम्पॅरीकल डाटा सादर न केल्यामुळे ते स्थगित केले आहे. ऊपलब्ध असलेला हा डाटा केंद्र सरकार ऊपलब्ध करून देत नाही. राज्य सरकारही हा डाटा जमा करण्याबाबत गांभीर्य दाखवत नाही. हा डाटा देण्यास असमर्थता दर्शवणारे शपथपत्र केंद्र सरकारने न्यायालयात सादर केले असून राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापण्यापलीकडे काहीही केल्याचे दिसत नाही. यावरून दोन्ही सरकारांबद्दल ओबीसींत नाराजीची भावना आहे.

    दोन्ही सरकारांनी टोलवाटोलवी करू नये. राज्याने एक तर हा डाटा ऊपलब्ध करून घ्यावा अथवा राज्य आयोगास आवश्यक ती सर्व शक्ती प्रदान करावी. या आयोगामार्फत एक महिण्याच्या आत हा ईम्पॅरीकल डाटा जमा करून तो न्यायालयात सादर करावा. हे होत नाही तोपर्यंत अखंड धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती दिनी १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. तर १३ डिसेंबर रोजी सोमवारी सकाळी १० वसंतराव नाईक चौक येथून मुख्य मार्गावरून रॅली काढत आंदोलनास प्रत्यक्ष सुरूवात होईल. यात अबाल-वृद्ध-महिला, विद्यार्थ्यांचाही सहभाग असणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी आरक्ष बचाओ कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

    *शहीन बाग-किसान आंदोलनाची प्रेरणा*
    हे अखंड धरणे आंदोलन शाहीन बाग आणि दिल्लीतील किसान आंदोलनाच्या धर्तीवर केले जाणार आहे. यासाठी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर कायमस्वरूपी मंडप, स्टेज ऊभारण्यात येत आहे. दररोज सायंकाळी आरक्षण संदर्भात विविध क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत यांची भाषणे होतील. तसेच विविध पारंपारीक माध्यमांतून प्रबोधन केले जाणार आहे. लोकसहभागासाठी समन्वय समिती गावोगावी जावून जनजागृती करणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.