जिल्ह्यातील आय.टी.आय.च्या तिसऱ्या पाळीतील तुकड्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा नव्याने अर्ज करता येणार ; रिक्त जागेवर मिळू शकेल प्रवेश

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.10डिसेंबर):-जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये तिसऱ्या पाळीतील तुकड्यांना प्रवेशाची परवानगी प्रशिक्षण संचालनालयाने दिलेली असल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी ज्यांची आजवर संधी हुकलेली आहे अशा इच्छूक उमेदवारांना रिक्त जागेवर नव्याने आॕनलाईन अर्ज करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अश्या उमेदवारांना दि.15 डिसेंबर पर्यंत पर्यंत itiadmissions@dvet.gov.in किंवा www.dvet.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. अर्ज केलेल्या इच्छूक उमेदवारांची गुणवत्ता यादी दि. 16 डिसेंबर ला संबंधित संस्थेत लावण्यात येईल.

रिक्त राहिलेल्या जागेसाठी समुपदेशन प्रवेश फेरीची प्रक्रिया रोज दि. 31 डिसेंबर पर्यंत सुरू राहील. रिक्त असलेल्या जागांची माहिती उमेदवारांना संकेतस्थळावर पाहता येईल.तसेच तेथे सूचित पुरवणी प्रवेश वेळापत्रकानुसार आणि दिलेल्या नोटीफिकेशन प्रमाणे समुपदेशन फेरीची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.शिल्प कारागीर योजना,आदिवासी उपाययोजना ,अल्पसंख्याक योजना, सार्वत्रिकरण योजना ,अनुसूचीत जाती संबंधित आदी योजनांच्या अंतर्गत ज्या जागा रिक्त आहे त्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी ही शेवटची संधी संचालनालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. अलिकडे मोठमोठ्या औद्योगिक आस्थापनात आय.टी.आय. व्यवसाय प्रमाणपत्र धारकांना मोठी मागणी वाढलेली आहे, हे विशेष.

समुपदेशन प्रवेश फेरीसाठी नोंदणी करून या प्रवेश फेरीचा इच्छूक उमेदवारांनी अवश्य लाभ घ्यावा. तसेच प्रवेशासाठी येताना स्वतःचे मूळ कागदपत्र / प्रमाणपत्र (छायांकित प्रती २ संचासह ) ,प्रवेश फि रक्कम व २ पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील औ.प्र.संस्थेच्या प्रवेशासाठीची ही संस्थास्तरावरची शेवटची संधी असल्याने प्रवेशासाठी इच्छूक उमेदवारांनी जवळच्या शासकीय औ.प्र.संस्थेशी संपर्क करावा आणि या संधीचा इच्छूक उमेदवारांनी अवश्य लाभ घ्यावा ,असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संतोष सांळुके यांनी केलेले आहे.