प्रेमाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील

    52

     

     

     

     

    ?फादर ड़े-प्रासंगिक लेख

    “आई दिव्याची ज्योत असते
    आणि तो प्रकाश दिव्याला मिळावा म्हणून
    ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा म्हणजे
    बाप असतो.”
    आई ही घराची लक्ष्मी असते. तर बाबा आयुष्याचा आधार असतो. फादर डे हा जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. कॅथलिक युरोप मध्ये मध्ययुगात 19 मार्चला सेंट जोसेफ च्या नावाने फादर्स डे साजरा होत असते. कारण ईशा मसिहाच पालन-पोषण करणारे ते त्याचे पिता होते. त्यानंतर हा दिवस अमेरिकेत स्पेन आणि पोर्तुगाल द्वारे आणण्यात आला. मदर्स डे प्रमाणे जे वडील आपल्या मुलांना वाढवतात त्यांच्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला. आज 21 जून त्याच पितासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा फादर डे आहे. “आर्चिस”या ग्रीटिंग कार्ड सारख्या दुकानाचा आगमन भारतात झालं आणि त्यानंतर भारतातही हा दिवस साजरा व्हायला लागला. आता फादर्स डे चे महत्व वाढलेले आहे.
    ” बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
    काळजी करणारे मन
    प्रेमाचा निखळ झरा
    स्वतःच्या इच्छा आकांक्षा
    बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारे अंतकरण”
    थं
    काय लिहू? किती लिहू? चारोळी मध्ये बंदिस्त करण्यासारखं बाबांचे व्यक्तिमत्व नाही. आई प्रेमाने घास भरवत असताना अंगाखांद्यावर खेळवणारे बाबा असते. कठोर शब्दांनी प्रेमामृत देणारे बाबा असते. परीक्षेत पास झाल्यावर पेढे आणणारे, स्पर्धेमध्ये ,नंबर आल्यावर पेपर मध्ये नाव आणि फोटो आला असेल तर कात्रण कापून व्यवस्थित फाईलला लावणारे, बाहेरून येताना आवडीचा खाऊ घेऊन येणारे, कौतुक करणारे बाबाच असतात. लहानपणापासून सगळ्या गोष्टी आईशी निगडित असतात पण बाबा म्हणजे खंबीर व्यक्ती आहे हे कळायला एक वय जावं लागतं. बाबांचा धाक लहानपणापासून सर्व मुलांना असतो. अर्थात आता ती परिस्थिती बदलली आहे. मुलांना जितकी प्रिय आई असते तितकाच प्रिय बाबाही असतो.
    “मातृ देवो भव पितृ देवो भव”.
    माता-पिता साक्षात परमेश्वराचे रूप आहे. भारतीय परंपरेनुसार जेव्हा उठल्यावर सूर्याला नमस्कार केला जातो तेव्हाच तो नमस्कार आपल्या वडिलांना हि पोहोचतो असे म्हटले जाते. जितकी महत्त्वाची आई असते तितकंच महत्त्व पितृत्वाचेही असते. वडिलांचं प्रेम हे प्रत्येक मुलांच्या आयुष्यात तितकेच महत्त्वाचे असते. ज्यांना वडील नसतात त्यांच्या डोक्यावर छत्रछाया नसते. त्यामुळे वडिलांना आपलंसं करणे आणि त्यांना जपनेही गरजेचे आहे. कारण एकदा का आयुष्याचा आधार हरवला की की कितीही परत यावा वाटलं तरीही ते शक्य होत नाही.
    “आई वडिलांचे प्रेम जन्मापासून मरेपर्यंत कधीच बदलत नाही
    बाकी सगळ्यांचे प्रेम मात्र वेळेनुसार बदलते.”
    आजकाल धावपळीच्या आयुष्यात इतका वेळ निघून जातो की आपल्या जन्मदात्यांशी बोलायला वेळ नसतो. फादर्स डे च्या दिवशी नक्की त्यांच्यासाठी वेळ काढा आणि बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. खरंतर आई-वडिलांना तुमच्या प्रेम आणि काळजी शिवाय काहीच नको असते.
    निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील असते.
    “आपली तहान भूक विसरून झटले जे आमच्यासाठी
    त्याचे ऋण कधीही फेडू नाही शकणार या जन्मी”.
    सर्वांना फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा.

    सौ भारती दिनेश तिडके
    रामनगर गोंदिया.
    8007664039