बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करा – माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

34

🔸तात्काळ पंचनामे करण्याचे कृषी अधिकाऱ्यांना आदेश

जालना(अतुल उनवणे, जिल्हा प्रतिनिधी)

जालना(दि 22 जून) जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस आणि सोयाबीनच्या बोगस बियाण्यांची विक्री केली गेलेली असून पेरणीनंतर आठ दिवस होऊन गेले असताना देखील बियाणे उगवलेले नाही अशा परिस्थितीत शेतकरी हताश आणि हैराण झाला असून दुबार पेरणी करण्याचा संकट बळीराजावर वाढवलं गेलं आहे यासाठी संबंधित बियाणे कंपनी आणि त्या कंपनीचे बियाणे विक्री करणारे डीलर यांनी स्वतः जबाबदारी घेऊन संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी तसेच प्रशासनाने अशाप्रकारे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे

मंठा तालुक्यातील किर्ला या गावातील शेतकरी विकास खंदारे यांनी सोयाबीन गोल्ड 3344 हे वाण असणाऱ्या सोयाबीनच्या तीन बॅग खरेदी (बॅच नं.A57150) केल्या होत्या परंतू पेरणी होऊन आठ दिवस झाले तरीसुद्धा सोयाबीन उगवले नाही म्हणून याबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी पंचायत समितीकडे तक्रार करा असे सांगत स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला म्हणून विकास खंदारे यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली त्यानुसार आमदार लोणीकर यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले असून तात्काळ पंचनामे करून विकास खंदारे आणि आणखी काही शेतकरी या बोगस बियाण्यांना बळी पडले असतील आणि त्यांच्या शेतीचे नुकसान झाले असेल तर त्याचे रीतसर पंचनामे करून शासनाने त्यांना मदत करावी अशी मागणी देखील बबनराव लोणीकर यांनी यावेळी केली कोरोना काळात अगोदरच जनतेचे प्रचंड हाल झालेले असताना दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर येणे ही अत्यंत गंभीर बाब असून दुबार पेरणी करावी लागल्यास शेतकरी उध्वस्त होतील त्यासाठी बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कठोर करावे करावी अशी मागणी लोणीकर यांनी केली

खंदारे यांच्या प्रमाणे तालुक्यात अजूनही अनेक शेतकरी अशा प्रकारच्या बियाण्यांची खरेदी करून उगवण न झाल्यामुळे त्रस्त असतील अशा सर्व शेतकऱ्यांनी जिल्हा व तालुका कृषी अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे आपल्या तक्रारी द्याव्यात आणि प्रशासनाने देखील तात्काळ संबंधितांची पंचनामे करून शासनाला कळवावे व सदरील कंपनी वर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी यावेळी केली बाधित शेतकरी विकास खंदारे यांनी लोणीकर यांच्याबरोबरच तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे देखील या बाबत तक्रार दिलेली आहे लवकरात लवकर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी अपेक्षा खंदारे यांनी यावेळी व्यक्त केली
================
*तात्काळ पंचनामे करा लोणीकरांचा प्रशासनाला आदेश*
संपूर्ण तालुक्याचा सर्वे करून ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे बियाणे विक्री करण्यात आले आहे आणि लागवड किंवा पेरणी केलेल्या बियाण्याची उगवण झालेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे सादर करावे सदरील कंपनीवर गुन्हा दाखल करा असे आदेश लोणीकर यांनी प्रशासनाला दिले आहेत ज्या शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले लागवड केली परंतु उगवण झालेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन देखील यावेळी लोणीकर यांनी केले प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या कामाबाबत ढकलाढकली न करता तत्परतेने काम करावे अन्यथा अशा कामचुकार आणि शेतकऱ्यांची दखल घेणार्‍या अधिकाऱ्यांना गंभीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील यावेळी लोणीकर यांनी दिला