कोरोना काळात समर्पित भावनेने काम करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान

42

🔹म.रा.मराठी पत्रकार संघ जिल्हा शाखा भंडारा चा उपक्रम

✒️भंडारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भंडारा(28 जून):कोविड-१९ संसर्ग काळात सामान्य जनतेला मदतीचा व विविध क्षेत्रात सेवा प्रदान करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान भंडारा जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे रविवार दि.२८ जून २०२० ला करण्यात आला.
देशात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे.तीन महिन्यापासून सगळं विस्कळीत झाले आहे.कोरोना जेंव्हा पाय रोवला त्यावेळी अधिक फटका सामान्य जनता,रोजंदार मजूर, विस्थापित व्यक्ती आदी लोक लॉकडाऊन झाली होती. अशा लोकांना मदतीचा हात देणारे अनेक जण पुढे आले. कोरोना संकट असताना आपले कर्तव्य समर्पित केले.अशा कठीण काळात विविध क्षेत्रात सामन्यांचा हित जपणाऱ्या व्यतींचा सन्मान भंडारा जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आला. यात आमदार राजू कारेमोरे(वरठी), मोहाडी ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष महादेव माटे(आंधळगाव),मोहाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निशांत मेश्राम(यवतमाळ),हरदोली(झं)चे ग्रामसेवक गोपाल सुभाष बुरडे(सिपेवाडा),सरपंच आनंद मलेवार(नेरी),दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत उदारामजी थोटे(मोहाडी)यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान भंडारा जिल्हा महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष सदाशिव ढेंगे,सचिव प्रवीण तांडेकर,हरिष मोटघरे,गणेश बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपाध्यक्ष राजू बांते,मोहाडी तालुका अध्यक्ष गिरीधर मोटघरे,सिराज नझीर शेख,नईम कुरेशी,नरेंद्र श्रीराम निमकर,हरीष मोटघरे आदी पत्रकार संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन राजू बांते यांनी केले तर आभार गणेश बर्वे यांनी केले.
********************************
*बांधावर तरुण शेतकऱ्यांचा सन्मान*
*******************************
कोरोनाने खेड्यातही शिरकाव केला आहे.जगाच्या पोशिंद्यावर संकट कोसळले आहे. अशावेळी.त्या संकट काळातील वेदना घेवून शेतकरी बांधावर जात आहे.प्रतिकूल परिस्थितीत संकटाला विसरून
जगाला पोसन्यासाठी शेतावर कामाला लागलेल्या पांजरा येथील तरुण शेतकरी २० वर्षीय निखिल रवी शेंडे यांचा शेतावर जाऊन भंडारा जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे खऱ्या हिरोचा सन्मान करण्यात आला.