घोडाझरी बफर झोन मध्ये वनविभागाची ओली पार्टी व जुगार

30

🔸जंगलात घमघमत होता मटणाचा वास.

🔹पत्रकारांना धमकी व शिवीगाळ.

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि:-28 जून)एकीकडे सध्या नागभीड तालुक्यात नागभीड वनपरिक्षेत्रात वन्यजीव व मानवी संघर्ष वाढत आहे. गेल्या 10 दिवसापुर्वीच घोडाझरी अभयारण्य लगतच वाघाने एका तुकुम च्या शेतकऱ्यास ठार मारले. तर दुसर्याच दिवशी बाम्हणी गावात एका वाघिनीने शेतकऱ्याला जखमी करत एका झोपडीत ठाण मांडले होते. व नंतर नवखळा या गावात जंगली डुकराने गावात शिरून तीन नागरिकांना जखमी केले तालुक्यात वन्यजीव-मानव संघर्ष पेटला असतांना मात्र नागभीड तालुक्यातील घोडाझरी वन्यजीव अभयारण्य मधील बफर झोन मध्ये नागभीड वनविभागातील एका अधिकाऱ्यांसह 20 ते 25 कर्मचारी दारू व मटण पार्टी सोबतच जुगार खेळन्यात मस्त आढळून आले.
वन्यजीव प्रेमी व पत्रकार हे पक्षी निरीक्षणासाठी गेले असता पार्टी ची कुणकुण लागताच घटनास्थळी पोचले. मात्र एका मद्यधुंद वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना धमकावनी देत अरेरावी करण्यात आली.
पत्रकार व वन्यजीव प्रेमी यांना ” तुम्हाला जंगलात शिरण्याची परवानगी कोणी दिली ? आमच्या पार्टी स्थळी तुम्ही कसे आले?” असे प्रश्न केले. तर वन्यजीवासाठी कार्य करणाऱ्या लोकांचे फोन उचला सहकार्य करा असे वरिष्ठ अधिकाऱ्याला सूचना केली असता एका वनरक्षकाने कुत्र्या-कोल्ह्याचे फोन उचलायचे का..? असा उलट प्रश्न केला.. व त्यानेच नंतर वन्यजीव प्रेमी ला धमकावत *”पुन्हा जंगलात आढळून आले तर इतक्या घनदाट जंगलात तुम्हाला दोराने फासी लावून झाडावर लटकावले तरी कोणाला पता चालणार नाही”* असी धमकी ही दिली.
तसेच दारूच्या नशेत जुगाराचा खेळ ही सुरु होता.लॉक डाऊन असताना आणि जिल्ह्यात दारूबंदी असतांना दारू आली कुठून ..? आणि शिजलेली मटण नेमकी कश्याची…? हा एक प्रश्नच आहे. सदर घोडाझरी अभयारण्य हे कोरोना मुळे बंद आहे आणि गेटवरच अभयारण्यात पार्टी करतांना आढल्यास कारवाही केली जाईल अशी सूचना लिहली आहे.. असे असताना वनाधिकारी च घोडाझरी मध्ये पार्टी करतात ते ही तालुक्यात वन्यजीव-मानव संघर्ष पेटला असतांना.
वनअधिकार्या समोर च वनरक्षक मधधुंद अवस्थेत पत्रकार व वन्यजीव प्रेमी सोबत अरेरावी ने वागतो व धमकावतो, तर संबंधित अधिकार्याचे आपल्या कर्मचार्यांवर कितपत नियंत्रण आहे हेही लक्षात येते.
अशी दारू मटण ची पार्टी ते ही दारुबंदी जिल्ह्यात,.? कोरोना महामारी मुळे जमावबंदी असतांना शासनाचे आदेश धारेवर धरून 20-25 लोकांची पार्टीकसी? याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन दारुच्या नशेत धमकावनार्या कर्मचार्या वर कठोर कारवाई करण्यात यावी
अशी मागणी विविध वन्यजीव प्रेमी कडून होत आहे.