पुरोगामी संदेश नेटवर्क

वर्धा:
सामूहिक बलात्काराच्या घटनेने वर्धा हादरला आहे. नोकरीचे प्रलोभन दाखवून एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणातील सहा आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गुंडांना आणि गुन्हेगारांना पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. वर्धा येथे काल, शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास एका १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वर्धा-यवतमाळ महामार्गाजवळच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवण्यात आले. नोकरी मिळवून देतो असे सांगून तिला देवळीकडे जाणाऱ्या एका फार्म हाऊसवर नेण्यात आले. तेथे सहा जणांनी या तरुणीवर बलात्कार केला. या घटनेची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली. सावंगी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या घटनेतील सहाही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास
सावंगी पोलीस करत आहेत.

क्राईम खबर , वर्धा, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED