आठवण शाळेची

37

✒️लेखिका:-सौ.सिंधु महेंद्र मोटघरे

आयुष्यात बराच वेळा अपेक्षाभंग होतोत. अचानक बदल घडतात. या होणाऱ्या बदलांना सामोरे जावे लागते. तशीच आजची परिस्थिती आहे. कोरोना -19 च्या प्रादुर्भावने संपूर्ण जगात हाहाकार झालेला आहे. याचा परिणाम शाळेवर मोठयाने झालेला आहे. माझी शाळा 250 पटसंख्या असलेली एक गजबजलेल ज्ञानवृक्ष. माझ्या दैनंदिन जीवनातील शाळा एक भाग आहे. आमची शाळा म्हणजे एक कुटुंब. शाळेत हितगुज साधले जाते. सध्या ती बंद पडली आहे. मला माझ्या शाळेची आठवण येत आहे.

शाळेत घंटा वाजली की, घंटेचा नाद कानावर पडता क्षणी विद्यार्थ्यांच्या पावलांना शाळेची ओढ सुरू व्हायची .आकाशात पक्षाने गिरक्या माराव्यात तशी गलबल चिमुकल्या विद्यार्थ्यांची रस्त्याने सुरू व्हायची .मित्र मैत्रिनिंची वाट बघणे. वडाच्या झाडावर पक्ष्यांची चिवचिव जशी सुरु असायची तशीच चिव चिव रस्त्यावर ऐकायला यायची. शाळेजवळ चौकात चिमुकल्या विद्यार्थ्यांची गर्दी व्हायची. विद्यार्थ्यांची कूजबुज सुरू असायची. झाडावर चैत्रात पालवी फुटावी तशी तशी गर्दी चौकात झाडाखाली असायची आणि झाडाखाली हे चिमुकले विद्यार्थी होमवर्क, अभ्यास गावातील घटनांचा आपसात वार्तालाप करत करत शाळेत येत असत.

सकाळी 11 वाजेपासून ही वेगाने दैनंदिन शाळेतील उपक्रम सुरू व्हायची. मुलांनि विचारलेल्या प्रश्नांच उत्तर देण्याच्या नादात आनंदाचे ज्ञानाचे झरे वाहू लागायचे. आमची शाळा पंढरी सारखी गजबजून जायची .कविता गायनाने दुमदुमून जायची. रंगीबिरंगी डिजिटल शाळा, आमच्या चिमुकल्या फुलांनी भरून जायची. आपल्या मॅडमबद्दल या मुलांना खूप विश्वास.मॅडम चे शब्द म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रमाण. वर्ग म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहात सर्वांना बरोबर घेऊन जातांना एका ज्ञानाच्या नावेत आपण प्रवास करत आहे, असा अनुभव यायचा. मध्ये कंटाळलेला विद्यार्थ्यां उभा राहून मॅडम गोष्ट सांगांना असं म्हणायचा. मुले गोष्ट ऐकताना दंग होऊन मान डोलवायचे प्रश्न विचारायचे,शंका दूर व्हायच्या .गोष्टीचे तात्पर्य मॅडमने सांगायचे याच गोष्टींच्या आधारावर मुलांना प्रश्न विचारायचे .मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यायचा. विद्यार्थी व्यक्त होत असत.

संध्याकाळी खेळायचा तास असायचा दिवसभर वर्गात थांबलेले विद्यार्थी मैदानावर आनंदाने ओरडत सोसाट्याचा वारा आल्या सारखा धावत सुटायचे. मॅडम कृतीयुक्य गाणे शिकवायच्या .स्पर्धा व्हायच्या .स्पर्धेत पाय मोकळे करायचे .धावण्याची स्पर्धा यात आपला जिवलग मित्र धावताना, त्याला प्रेरणा देण्यासाठी ,उमेद देण्यासाठी ,प्रोत्साहन देण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी गर्दी व्हायची. मित्र जिंकल्यानंतर त्याला मिठीत घेऊन अभिनंदन करायचं. शाळेच्या अभिनंदन मैदानावर उधाण आलेले असायचे .जल्लोष साजरा व्हायचा. शाळेमध्ये दररोज नवनवीन शिकायला मिळायचे. शाळेत मॅडम लेझीम व अनेक उपक्रम शिकवटीच्या.सर्वांनाच आले पाहिजे म्हणून मॅडमनी लेझीम प्रात्यक्षिक करून दाखवायचे. नंतर ढोलावर सराव व्हायचा. ढोलाच्या आवाजात पाय आणि हात लेझीम घेऊन नाचत असत. सर्व शाळा एकाच वेळेस लेझीम खेळत असे. मॅडम समोर गणेशोत्सवा सारखे वातावरण तयार व्हायचे .पाच वाजले तरी हा खेळ चालुच राहत होत. घर विसरल्या सारखं व्हायचे मुलांना.

अचानक एक दिवस कोणीतरी विषाणूचा दगड झाडावर मारला आणि झाडा वरील सर्व चिमुकली पाखरे उडून घरट्यात जाऊन बसली. शाळेची वाट बघत ……..

             ✒️सौ. सिंधू महेंद्र मोटघरे
जी .प. व. प्रा. शाळा तुमखेडा बु. ता गोरेगाव जी .गोंदिया
                   मो .9404306224