भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी ची शक्यता बघता दोन दिवस सर्व शाळा बंद चे जिल्हाधिकारी कडून आदेश

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.18जुलै):-भारतीय हवामान विभाग, नागपुर यांचेकडील प्राप्त झालेले संदेशानुसार भंडारा जिल्ह्यात yellow अलर्ट देण्यात आलेले असुन मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. पुरपरिस्थितीमुळे होणारे अपघात टाळण्याकरीता दिनांक 18 जुलै ते 20 जुलै 2022 पर्यंत शाळांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या कडून देण्यात आले आहेत.

व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून भंडारा जिल्ह्यातील पुरपरिस्थितीवर उचित नियंत्रण मिळविण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत दिनांक 18 जुलै ते 20 जुलै 2022 दरम्यान भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळा (शासकिय व खाजगी) व सर्व शिकवणी वर्ग बंद करण्याचे आदेश देण्यात आले. सदर आदेशाचे उल्लघन झाल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कडून सुचविण्यात आले.