आपत्ती काळात तलाठी, ग्रामसेवक मुख्यालयी ठेवा!

85

🔸अ.भा.किसान सभेची तहसीलदार व बी डी ओ कडे मागणी

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.18जुलै):-नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. नदीकाठच्या गावांना पुराने वेढा घातलेला आहे. नागरिकांनी जीव धोक्यात घालून रात्र काढलेली आहे. आपत्तीच्या काळात मुख्यालयी तलाठी व ग्रामसेवक राहणे आवश्यक आहे. संबंधितांना आदेश असतानाही ते मुख्यालयी का राहत नाही. आपत्ती काळात तलाठी व ग्रामसेवक मुख्यालयी ठेवा या मागणीचे निवेदन तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी व गटविकास अधिकारी पी एस नाटकर यांना अ भा किसान सभेचे जिल्हा सहसचिव श्याम शिंदे यांचे नेतृवात देण्यात आले.

संततधार पावसामुळे खेड्या भागातील व शहरातील नागरिकांच्या भींती पडलेला आहे. पंचनामे तातडीने करणे, मदत करणे, रेस्क्यू चमू तातडीने तहसील परिसरात रहावी याची मागणी करण्यात आली तसेच खरडून गेलेल्या शेतीचे पंचनामे तात्काळ करा यावेळी अ. मोहसिन शेख, पुंडलिक पुंड, अंकुश शिंदे, असलम खान, अंकुश शिंदे, आसिफ खान, शहंशाह, रामेश्वर मारोटकर,सलमान खान, सय्यद राजिक यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते