17 वर्षीय तरुणीने केली गळफास घेऊन आत्महत्या

26

✒️हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क)

हिंगणघाट(दि.६जुलै)तालुक्यातील येरणगाव येथील १७ वर्षीय तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना दि.६ रोजी सायंकाळी घडली असून मृतक युवतीची ओळख साक्षी विलास देवतळे अशी आहे.
         वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येरणगाव येथील रहिवाशी मृतक साक्षी ही १२ व्या वर्गात शिकत असून ती नागपूर येथे काकाचे घरी राहून शिक्षण घेत होती. लाँकडाउन दरम्यान ती चार महिन्यांपूर्वी नागपूर वरून येरणगाव येथे आई वडीलांकडे आली होती. घटनेच्यावेळी साक्षीचे आई वडील बाहेर गावी कामा निमित्त गेले होते. घरी वृध्द आजोबा आणि लहान भाऊ घरी हजर होते. सायंकाळी ६ वा. चे सुमारास आजोबा गोठ्यात बांधुन असलेल्या गुरांची देखभाल करण्यासाठी गेले तर भाऊ सर्वेश (१०) हा घराबाहेर खेळायला गेला होता. नेमकी हीच संधी साधुन साक्षीने घराच्या छताला टांगलेला कापूस मोजण्याच्या वजन काटयाच्या दोराने गळफास घेतला. आजोबा घराकडे येत असतांना वाटेत नातू खेळत होता. त्याचेवर आजोबा रागावल्याने तो घरी पळत गेला असता साक्षीने गळफास घेतल्याचे दिसले,त्याने घराबाहेर येऊन सांगितल्यावर शेजारच्यांनी घराकड़े धाव घेतली असता कु.साक्षी ही गळफास घेऊन मृतावस्थेत आढळली. वडनेर पोलिसांनी या प्रकरणी घटनेची नोंद घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवीण्यात आला.पुढील तपास वडनेर पोलिस करीत असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.