🔺अमेरिकेची घोषणा, हजारो भारतीयांना फटका
लाखो विद्यार्थ्यांना सोडावी लागणार अमेरिका

विद्यार्थी व्हिसावर अमिरेकेत गेलेल्या विद्यार्थ्यांना करोना महामारीमुळे खूप मोठा धक्का बसला आहे. करोना संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त ऑनलाइन होत आहे अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. इमिग्रेशन आणि सीमा शुल्क अंमलबजावणीकडून यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे. सीएनएनने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाने ऑनलाइन शिक्षणास सुरुवात केली असेल तर त्या विद्यार्थ्यांना देश सोडावा लागणार आहे अन्यथा त्यांना हद्दपार केलं जाईल असं आदेशात सागंण्यात आलं आहे. अमेरिकेत अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी व्हिसावर प्रवेश दिला जाणार नाही.

अमेरिकेच्या या निर्णयामुळे उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पाहणाऱ्या हजारो-लाखो विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. होमलँड सेक्युरिटी विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्याच्या घडीला ११ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांकडे विद्यार्थी व्हिसा आहे. अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये चीननंतर अनुक्रमे भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया आणि कॅनडा येथील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस सुरु झाले आहेत त्यांच्याकडे अमेरिकेत वास्तव्य करण्यासाठी कोणतंच कारण नसल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. प्रशासनाने सर्व विद्यापीठ आणि कॉलेजना सर्व कोर्सेस लवकरात लवकर ऑनलाइन सुरु कऱण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेने सर्व विद्यार्थ्यांना आपल्या देशात पाठवण्यासाठी योजना आखली आहे. अनेक भारतीय विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

कोरोना ब्रेकिंग, मिला जुला , राजकारण, राजनीति, राष्ट्रीय, शैक्षणिक, हटके ख़बरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED