सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सत्कार

23

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.22सप्टेंबर):-राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग व नगरपालिका कंत्राटी कर्मचारी यांच्या वतीने म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक – सचिव अ‍ॅड. राजू भोसले यांच्या हस्ते कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी झालेल्या बैठकीमध्ये अ‍ॅड. राजू भोसले म्हणाले,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ साहेब गोरगरीब, उपेक्षित लोकांना केंद्र बिंदू मानून त्यांना न्याय हक्क देण्यासाठी प्रामाणिक पणे काम करीत आहेत. गोरगरीब, दलित उपेक्षित लोक भुजबळ साहेबांना खाकीतील दैवत मानत आहेत.यामुळेच पी एस आय राजकुमार भुजबळ साहेब यांचा कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून सत्कार करत आहोत. असे सांगून यावेळी अ‍ॅड. राजू भोसले यांनी म्हसवड नगरपालिका सफाई कामगारांचा तीन वर्षाचा पी. एफ. व एक महिन्याचा BVG कंपनीचा पगार नगरपालिका मुख्याधिकारी यांनी तात्काळ द्यावा यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष घालण्याची विनंती केली.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ म्हणाले, उपेक्षित लोकांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे गरजेचे आहे. त्यांचा तो अधिकारच आहे. गोरगरीब, उपेक्षित अन्यायग्रस्त लोकांसाठी मी सदैव मदतीला असून सर्वसामान्य लोकांसाठी मी सदैव काम करत राहणार आहे. असे सांगून त्यांनी नगरपालिका सफाई कामगारांचा तीन वर्षाचा पी. एफ. व एक महिन्याचा BVG कंपनीचा पगार मिळण्यासाठी संबंधित पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले. यावेळी अ‍ॅड. राजू भोसले अनिल सरतापे, अमर लोखंडे, मारुती लोखंडे, अवि लोखंडे, कॉ. जाधव, यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.