चिमुरात मानवाधिकार सहाय्यता संघाची सभा संपन्न

39

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.22सप्टेंबर):-मानवाधिकार सहाय्यता संघ तालुका शाखा चिमूरच्या वतीने जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था सभागृहात नुकतीच सभा संपन्न झाली. या सभेला मानवाधिकार सहाय्यता संघ महाराष्ट्राचे प्रदेश प्रमुख कल्पेश व्यास, प्रदेश अध्यक्ष गुन्हे शाखा राजीव विश्वकर्मा, प्रदेशाध्यक्ष रवी धारणे, मंगला वेदी, चिमूर शाखा तालुकाध्यक्ष सुभाष शेषकर, चिमूर शाखा महिला तालुकाध्यक्ष नीता लांडगे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी रवी धरणे यांनी मार्गदर्शनात म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात मानवाधिकार सहाय्यता संघाचे इमानेइतबारे काम करणारे सदस्य निर्माण करणे आवश्यक आहे. त्याकरिता कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे. तसेच येत्या जानेवारी महिन्यात संघाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुर येथे होणार आहे. त्याकरिता संपूर्ण सदस्यांचे सहकार्य मिळायला हवे.

सभेचे संचालन माजी प्राचार्य सुधीर पोहनकर यांनी केले. यावेळी मानवाधिकार सहाय्यता संघ तालुका शाखा चिमूरचे जेष्ठ समाजसेवक केशवराव वरखेडे, रंगनाथ बांगडे, वंदना शेषकर, रामभाऊ खडसिंगे, प्रवीण कावळे, सुषमा पिंपळकर, नर्मदा भोयर, माधुरी आवारी, हर्षा वैद्य, केमदेव वाडगुरे, पुरोगामी संदेशचे संपादक सुरेश डांगे, किशोर भोयर, रमेश भोयर, माजी अधिक्षक हेमराज दांडेकर, रुपाली पाल, पवन जुमडे, लक्ष्मी चौधरी, शुभम भुडे, स्वप्नील मेश्राम, मिलिंद जांभुळे, नरेंद्र विखार, रवी कोरामे आदी उपस्थित होते. सभेत विविध विषयावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.