यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठी बांधकाम साहित्य प्रदर्शनी

38

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.21सप्टेंबर):- येथील उमरखेड तालुका अभियंता संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या “औदुंबर बांधकाम साहित्य प्रदर्शनी व गृह कर्ज मार्गदर्शन शिबिर ” दि 23 व 24 सप्टेंबर ला जिल्ह्यातील सर्वात मोठी बांधकाम साहित्य प्रदर्शनी होणार आहे असे तालुका अभियंता संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे.

या कार्यक्रमाला उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी यवतमाळ अमोल येडगे तसेच प्रमुख उपस्थितीत अधीक्षक अभियंता सा. बा . वि . दिपक सोनटक्के , स .संचालक नगर रचना यवतमाळ कीरण राऊत , जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास यवतमाळ धीरज गोहाड, उपविभागीय अधिकारी उमरखेड डॉ . व्यंकट राठोड, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा जि प यवतमाळ प्रदीप कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, कार्यकारी अभियंता सा बा वि पुसद प्रिया पुजारी, तहसीलदार आनंद देऊळगावकर , मुख्याधिकारी न.प. किरण सुकलवाड, पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रदर्शनी व मार्गदर्शन शिबिर पार पडणार आहे.

ग्रामीण भागात होत असलेला ह्य उपक्रम निश्चितच ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेसाठी मार्गदर्शक ठरेल व या भागातील तरुणांच्या रोजगारांना नवचैतन्य मिळण्याचे उपक्रम या उद्देशाने उमरखेड तालुका अभियंता संघटनेने आयोजित केलेल्या बांधकाम साहित्य प्रदर्शनी व गृह कर्ज मार्गदर्शन शिबिराचा आयोजन करण्यात आलेला आहे.

औदुंबर बांधकाम साहित्य प्रदर्शनी ही नागरिकांमध्ये बांधकाम साहित्य व त्यातील नवीन तंत्रज्ञान विषयक माहिती पुरविण्याकरीता आयोजित केलेली आहे.

या प्रदर्शनीमध्ये नागरिकांना सिमेंट, स्टील, स्टाईल,इलेक्ट्रिक फिटिंग, प्लंबिंग ,सेलिब्रेशन, कलर्स व इंटिरियर फर्निचर साहित्य बद्दल जागृत व मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातून बांधकाम क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग या प्रदर्शनी मध्ये आहे.

तरी सर्व नागरिकांनी या संधीचा आवश्यक लाभ घ्यावा असे आव्हान उमरखेड तालुका अभियंता संघटनेचे अध्यक्ष सतीष पत्रे व उपाध्यक्ष अभियंता राहू पंडागळे यांनी केले आहे.