उमरखेड मारलेगाव फाटा येथे एसटीचा भीषण अपघात!

21

🔹अपघातात एक जण ठार तर अनेक जन गंभीर जखमी

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा,प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.27सप्टेंबर):- उमरखेड मारलेगाव फाट्याच्या समोर एसटीचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त कळले असून दुपारी
4:30मी च्या दरम्यान हा अपघात घडला असुन अपघाताचे कारण एसटी बसचा समोरील टायर फुटल्यामुळे अपघात घडला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सविसतरवृत्त असे की उमरखेड हदगाव नांदेड या मार्गावर
हा मार्ग निर्माण झाला तेव्हापासून अनेक अनेक अपघाताची मालिका सुरू आहे.

तसाच अपघात दि. 26 सप्टेंबर 2022 दुपारी 4: 30 मी च्या सुमारास घडला असून या अपघातामध्ये संतोष गंगाधर काळबांडे वय 38 वर्ष राहणार हदगाव जिल्हा नांदेड यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आली असून विठ्ठल व्यंकटी मुंडे वय 40 वर्षे कंधार डेपो वाहन चालक तसेच मारुती टिकाराम नरवाडे वय 75 वर्षे राहणार वाटेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड या दोघांना गंभीर मार असल्यामुळे पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविले आहे.

यांच्या शिवाय इतर सात प्रवाशांना मार लागल्यामुळे यांचे वर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे.

सविता मानंदराव नरवाडे पिंपळगाव ता. उमरखेड,
सिमा जामोदकर 25 मुगट ता.मुखेड, रोशणी जामोदकर 36 मुगट ता.मुखेड, जनाबाई धोंडीबा कांबळे 60 येळेगाव ता. कळमनुरी, वच्छलाभई बढोराम काळे 75 येळेगाव ता. कळमनुरी, कपिल दिलीपराव साळवे 29 डोलारी ता. हिमायतनगर, मारोती माधव शिंदे 65 कुपटी ता माहुर. यांच्याशिवाय काही प्रवासी हादगाव येथे उपचारासाठी घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अपघातामध्ये एका टेम्पोचा सुद्धा समावेश असून घडलेल्या घटनेचा पुढील तपास एसटी प्रशासन अधिकारी करीत आहेत.