डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांची 97 वी जयंती संपन्न

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 26 सप्टेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा ब्रह्मपुरी द्वारे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा (ब्रम्हपुरी) चे सचिव मा.डॉ.देवेश कांबळे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांचे जीवनकार्य आणि रिपब्लिकन चळवळीची दिशा यावर भाष्य केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. किशोर मानकर, आयएफएस, गडचिरोली यांनी केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यानी बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले रिपब्लिकन चळवळीचे अभ्यासक, तथा सामाजिक कार्यकर्ते, मा. प्रशिक आनंद, नागपूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रिपब्लिकन चळवळीचा सोनेरी इतिहास आणि सद्याची भयावह राजकीय अस्थिरता यावर भाष्य केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मा. सिद्धार्थ मेश्राम, माजी प्राचार्य, नांदुरा यांनी रिपब्लिकन चळवळीतील आपले अनुभव करून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा. तुफान भास्कर अवताडे यांनी केले तर प्रा. सरोज शिंगाडे यांनी आभार मानले. महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख प्रा.गणेश तिवाडे आणि संच यांनी याप्रसंगी बुध्द-भीम गीते सादर केले.

या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी तसेच शिक्षण संस्थेद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ब्रह्मपुरी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ब्रह्मपुरी, बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे बी.एड. कॉलेज, मिराबाई कांबळे नर्सिंग कॉलेज, आणि ब्रह्मपुरी पब्लिक स्कूल येथील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तथा रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.