उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे मोठा कीर्तन महोत्सव

41

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.26सप्टेंबर):- तालुक्यात सर्वत्र नवरात्र उत्सवाची उत्साहात सुरुवात झाली असून तालुक्यापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या विडूळ येथील एकता दुर्गोत्सव मंडळ यांची विशेषता अशी आहे की मागील 23 वर्षापासुन म्हणजेच 1999 पासून आज पर्यंत प्रत्येक वर्षी कीर्तन महोत्सवाच्या आयोजनाची परंपरा या मंडळाकडून आजपर्यंत कायम आहे.

दरवर्षी येथील किर्तन महोत्सवात नामवंत कीर्तनकार किर्तन करण्यासाठी दूरवरून येतात त्यानुसार यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात घटस्थापनेच्या दिवसापासून किर्तनाला सुरुवात होत आहे त्यानुसार 26 व 27 तारखेला ह. भ. प. हरिहर बुवा नातू मालवण सिंधुदुर्ग यांच्या कीर्तनाचा लाभ श्रुत यांना मिळणार आहे तर 28 व 29 तारखेला ह. भ. प. शरद महाराज आंबेकर वसमत यांचे कीर्तन असणार आहे त्यानंतर 30 व एक ऑक्टोबर रोजी ह. भ. प. चारुदत्त बुवा आफळे पुणे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तर 2 ऑक्टोबर रोजी ह. भ. प. मुकुंद बुवा देवरस किर्तन भूषण नागपूर यांचे कीर्तन असणार आहे नवरात्र उत्सवातील शेवटचे दोन दिवस तीन व चार ऑक्टोबर रोजी ह. भ. प. रोहिणीताई परांजपे ( माने ) यांच्या कीर्तनाचा लाभ स्रोत यांना मिळणार आहे.

यासोबतच या सर्व कीर्तनकारांना साथ देण्यासाठी तबलावादक म्हणून गजानन देसाई कुडाळ रत्नागिरी हे असणार आहेत तर हार्मोनियम वादक म्हणून कौस्तुभ परांजपे पुणे यांची साथ असणार आहे परिसरातील भाविक भक्तांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन एकता दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष कल्याण रामचंद्र देशमुख यांनी केले आहे.

चौकट – (येथील एकता दुर्गेश मंडळाला सर्व गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य असून दरवर्षी वेगवेगळ्या देवींच्या शक्तीपीठामधून ज्योत आणण्याचे कार्य येथील युवक मंडळी मोठ्या प्रमाणात करत आहे.)

त्यानुसार यावर्षीही येथील युवकांनी सप्तशृंगी वनी नाशिक येथून पायी ज्योत आणून विडोळी येथील एकता दुर्गो मंडळात त्या ज्योतीची प्रतिष्ठापना केली. यासाठी बाळू काचर्डे व त्यांच्या मित्र मंडळींनी परिश्रम घेतले.