चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दांनी आखाड्याच्या विद्यार्थ्यांचे घवघावित यश

30

🔹ब्रम्हपुरी आणि नागभीड येथील विद्यार्थ्यांचा सहभाग

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26सप्टेंबर):-राज्यस्तरीय 17 वी, आष्टेडू मर्दानी आखाडा स्पर्धा- 2022 नागपूर येथे नुकताच संपन्न झाली. ह्या स्पर्धेत शिवकला, हस्तकला, पदकला, पदसंतुलन या कलेचा समावेश होता. हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातील असून, त्यात अनेक प्राचीन कलेचा समावेश आहे. या स्पर्धेत राज्यातून विविध जिल्ह्यातील विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

यामध्ये, चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशन ब्रम्हपुरी आणि ट्विकल इंग्लिश स्कूल नागभीड येथील विद्यार्थांनी संयुक्तरित्या चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करित सहभाग नोंदविला.

“हस्तकला” या स्पर्धेत 14 वर्षा खालील वयोगटात (वजन गट 26-30) कु.अर्पिता जीवतोडे, हिला सुवर्ण पदक प्राप्त झाला. तसेच (वजन गट 31-35) कु.सोनाली जांभूळे, हिला रज्जत पदक प्राप्त झाले. (वजन गट 36-40) मध्ये कु.लक्ष्मी आळे हिला सुवर्ण पदक, तर कु.श्रेया सरपाते हिला कांस्य पदक प्राप्त झाले. तसेच (वजन गट 41-45) मध्ये कु.साक्षी गायकवाड सुवर्ण पदक, तर कु.तेजस बालपांडे याला कांस्य पदक, आणि (वजन गट 46-50) मध्ये कु.तुषार वटी याला सुवर्ण पदक, तसेच कु.समृद्धी कुलसिंगे हिला कांस्य पदक प्राप्त झाले

17 वर्षा खालील वयोगटात (वजन गट 31-35) मध्ये नुपूर ननावरे – रज्जत पदक, तर (वजन गट 36-40) मध्ये कु.तनुश्री एकुडे- कांस्य पदक.. तसेच (वजन गट-41- 45) मध्ये कु.बबली ताळाम हिला रजत प्राप्त झाले.. आणि (वजन गट 46-50) मध्ये कु.श्रद्धा शिडाम-सुवर्ण पदक, तसेच कु.शिव वाढई -रजत पदक, आणि कु.रोहिणी गरमळे हिला कांस्य पदक प्राप्त झाले. (वजन गट 51-55) मध्ये कु.सावी धुर्वे -सुवर्ण पदक, तर कु.धम्मदीप बनकर याला कांस्य पदक, कु.रक्षा मडावी हिला कांस्य पदक प्राप्त झाले..(वजन गट 36-40) मध्ये कु.भोला गजभिये यास सुवर्ण पदक, तर (वजन गट 41-45) मध्ये कु.हरिष दडमल- सुवर्ण पदक, तसेच (वजन गट 46-50) मध्ये कु.धनंजय मेश्राम- रजत पदक, तर (वजन गट-51-55) मध्ये कु.करण रणदिवे यास रज्जत पदक प्राप्त झाले आहे.

आणि सर्वात मोठ वयोगट, म्हणजे 19 वर्षावरील वयोगटात कु.अक्षय कुळे यांनी शिवकला क्षेत्रात सुवर्ण पदक पत्काविले असून, कुमारी.विभाश्री भेंडारे हिला सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे..

या संपूर्ण विजेत्या विध्यार्थ्यांचे घवघवीत यश पाहून, संस्थेचे अध्यक्ष श्री.गणेश तर्वेकर, तसेच सचिव श्री. गणेश लांजेवार, कोषाध्यक्ष उदयकुमार पगाडे, व सहसचिव सचिन भानारकर यांनी शुभेच्छा देत, त्यांना आशीर्वाद दिले.