प्रहार जनशक्ती पक्षाचा उमरखेड- महागाव विधानसभा अध्यक्ष पदी बंडू हामंद यांची निवड

22

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.29सप्टेंबर):-तालुक्यातील मतखंड म्हणून ओळखले जाणाऱ्या माणकेश्वर या गावासह जवळपास आजूबाजूच्या सर्वच गावात प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखा मोठ्या प्रमाणात वाढत असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार बच्चुभाऊ कडू यांची महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर,दिव्यांग, विधवा महिला, भगिनी यांच्या प्रति असणारी संवेदनशीलता व त्यांच्या काम ची वृत्ती पाहून प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे.

चातारी येथील स्थायी असलेले सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेणारे बंडू हामंद यांनी यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांसह माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर दि. 24 सप्टेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जंवजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष बिपीन चौधरी यांनी बंडू हमंद यांची उमरखेड महागाव विधानसभा प्रमुख पदी निवड केली. या निवडीमुळे प्रहार जनशक्ती पक्ष प्रस्तापित पक्षांना बाजूला सारत मतखंडात सुरुंग पाडत असल्याने प्रस्थापितांच्या गटात उलट वारे वाहताना दिसत आहे.

बंडू हमंद यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमरखेड महागाव विधानसभा प्रमुख पदी निवड झाल्यानंतर त्यांनी या भागात गाव तिथे शाखा हा उपक्रम हाती घेतला असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या झेंडा फडकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.