अनगरची कन्या ऋतुजा पाटील बनली पायलट

30

🔹ऋतुजाच अनगरमध्ये आगमन होताच आ. यशवंत तात्या माने यांच्या हस्ते स्वागत व सत्कार

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.30सप्टेंबर):- कॅनडाहुन कु. ऋतुजा राजन पाटील’ अनगर नगरीत आगमन होताच, आमदार यशवंत तात्या माने, पाटील कुटुंबीयांकडून व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आहे.

पायलटचे संपूर्ण शिक्षण पूर्ण नेजमेंटचे’ शिक्षण कॉन्व्हेंटरी विद्यापीठ इंग्लंड येथून पूर्ण केले आहे तर पुढे पॅसिफिक प्रोफेशनल फ्लाईट सेंटर, व्हॅनक्युअर, कॅनडा येथे कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण घेतले आहे. व सध्या एअर नॉर्थ या कंपनीच्या एक उत्कृष्ठ कमर्शियल पायलट म्हणून कॅनडा मध्ये कार्यरत आहेत. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे आज जल्लोषात स्वागत केले. स्वागतासाठी मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते मा. आ. राजनजी पाटील साहेब, आमदार मा. यशवंत (तात्या) माने साहेब, जेष्ठ बंधू बाळराजे पाटील आदी मान्यवरांसह संपूर्ण पाटील परिवार तसेच अनगर परिसरातील पाटील परिवारावर प्रेम करणारी जनता प्रचंड मोठया संख्येने उपस्थित होती.

यावेळी अनगरकर ग्रामस्थांच्यावतीने आपल्या लाडक्या लेकीच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ‘मातोश्री’ (पाटील वाडा) पर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामदैवत श्री. अनगरसिद्ध महाराज, श्री. शंभू महादेव, छत्रपती शिवाजी महाराज व नगरपंचायत येथे आजोबा लोकनेते कै. बाबुराव (अण्णा) पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. मिरवणूक मार्गावर गावातील माता भगिनींनी औक्षण व पुष्पवर्षाव करुन आपल्या लाडक्या लेकीचे जल्लोषात स्वागत केले.

मा.आ. राजनजी पाटील, लोकनेतेचे चेअरमन मा बाळराजे पाटील,पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, प्रकाश चवरे, सो.दुध संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक माळी, हनुमंत पोटरे ,भारत सुतकर, अनिल कादे, वैभव बापू गुंड, ऱाम क्षीरसागर,संतोष वाबळे आदीसह इतर पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.