डोंगरहळदी येथील बंडू गुरनुले यांच्‍या कुटूंबियांना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला मदतीचा हात

43

✒️गोंडपीपरी(नितीन रामटेके, तालुका प्रतिनिधी)

मो:-8698648634

गोंडपीपरी(दि-8 जुलै):-पोंभुर्णा तालुक्‍यातील डोंगरहळदी या गावातील श्री बंडू मोतीराम गुरनुले यांचे घर अतिवृष्‍टीमुळे कोसळले व घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती पोंभुर्णा पंचायत समितीचे सभापती अलका आत्राम यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या कळविताच त्‍यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्‍वरीत श्री. बंडू गुरनुले यांना आर्थीक मदत केली व जीवनावश्‍यक वस्‍तु आणि धान्‍य अलका आत्राम, भाजपाचे तालुकाध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, उपसभापती सौ. ज्‍योती बुरांडे यांच्‍या मार्फत सदर मदत बंडू गुरनुले यांच्‍या कुटूंबियांना पोचती केली.
 आ.सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेत आर्थिक मदत व धान्‍य तसेच जीवनावश्‍यक वस्‍तु पाठवून आधार दिल्‍याबद्दल बंडू गुरनुले यांनी आ. मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.