राष्ट्रयोद्धा तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या

28

🔸सामजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांची केंद्र सरकारकडे मागणी

✒️वर्धा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वर्धा(दि.18ऑक्टोबर):- गावापासून ते देशापर्यंत देशापासून अखिल विश्वाला मानवतेचा विचार देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न मिळण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरत आहे. महाराजांनी रचलेल्या साहित्यातून आजही समाज प्रबोधन अविरत समाज जागृतीचे काम सुरू आहे.

अशा राष्ट्रयोद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न सन्मान द्यावा अशी मागणी जनकल्याण फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा युवा सामजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांच्याद्वारे करण्यात आली आहे.या संदर्भात राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पाठपुरावा केला होता परंतु अद्याप केंद्र सरकार जवळ तो प्रस्ताव धूळखात आहे.या अतिशय महत्वपर्ण भारतरत्न प्रस्तावावर काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे समस्त गुरुदेव सेवकांमध्ये तीव्र अस्वस्थता पसरलेली आहे.आता ही चळवळ होत आहे.

अनेक गावातून, शहरातून निवेदने, ग्रामसभेचे ठराव पंतप्रधानाकडे जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विश्वव्यापी कार्य लक्षात घेता तत्काळ भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करून जनतेची ही मागणी पूर्ण करावी.केंद्र सरकारने राष्ट्रयोद्धा,समाज सुधारक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी जनकल्याण फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा युवा सामजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांच्यावतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.