पंचनाम्याचे थोतांड बंद करा आणि सरसकट विमा मंजूर करा – पुजा मोरे

13

🔹स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र असा आंदोलनाचा इशारा

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.18ऑक्टोबर):- जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. एवढं सगळं नुकसान डोळ्यासमोर असताना आणि दिवाळी तोंडावर असताना देखील प्रशासन मात्र पंचनामे करून जाणीवपूर्वक वेळ काढू पणा करत आहे.पंचनाम्याला आलेले अधिकारी देखील कुण्या ऐका ओळखीच्या व्यक्तीला हाताशी धरून पंचनामे करतात. अश्या तोंड बघून केलेल्या पंचनाम्यामुळे सामान्य शेतकरी हा मदतीपासून दूर रहातो असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे यांनी केला आहे.

एक तर शेतकरी दुःखात आहे. त्यात त्याला रोज नवीन नियम सांगितले जातात. ई- पीक पाहणी करा. पुन्हा ऑनलाइन तक्रार करा नसता विमा मिळणार नाही अश्या अफवामुळे शेतकरी संभ्रम अवस्थेत आहे.त्यामुळे हे पंचनाम्याचे गुऱ्हाळ बंद करा आणि शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा व NDRF/SDRF च्या निकषानुसार दिवाळी आधी अनुदान दया अशी मागणी पुजा मोरे यांनी जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी,बीड यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेत पालकमंत्री अतुल सावे यांच्यासोबत देखील पुजा मोरे यांनी फोनद्वारे चर्चा करून ही बाब त्यांच्या कानावर घातली असून दोन दिवसात पंचनामे बंद करून सरसकट पीकविमा देण्याचा निर्णय न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पुजा मोरे यांनी दिला आहे.