विनायक दामोदर सावरकरांच्या नाट्याने गंगाखेड शहरवासीय भारावले

16

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18ऑक्टोबर):-दिनांक 16 ऑक्टोबर रविवार रोजी संत जनाबाईच्या गंगाखेड नगरीत साईवृंदावन मंगल कार्यालय येथे प्रथमच अखिल भारतीय महिला व पुरुष ब्राह्मण महासंघाच्या वतीने एक पाऊल पुढे टाकत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्या यांच्या जीवनावरील परिवारांची थरारक अंगावर शहारे आणणारी यशोगाथा वीस व्यक्तींचा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यनाट्य संच सावरकर घराण्यातील महिलांची धगधगती जीवनगाथेची मूळ संकल्पना व प्रमुख भूमिकेत राजश्री पोहेकर यांची असून वि दा सावरकर यांची हुबेहूब भूमिका पार पाडणारे तेजस महाजन,संहिता व निवेदन प्रा.प्रितीताई पोहेकर,दिग्दर्शन राजश्री कुलकर्णी,लेकुरवाळे,शिवाली गायकवाड,नंदिनी जोशी ,सानिका ओक,साक्षी पिसाळ,सानिका घोडके, शबरी गायकवाड,पूर्वा लाड,आदिती खडकीकर,निशांत पवार ,नचिकेत सोनार,कमलेश देशपांडे,इशान महाजन,ध्वनी योजना अविनाश थीगळे, प्रकाश योजना वाल्मिक जाधव, रंगभूषा अनिल प्रधान,संगीत धीरज मिस्त्री आदी कलाकारांनी त्रिवेणी नाट्यातून थरारक असे अविष्कारक सादर करून गंगाखेड शहरवासियांना मंत्रमुग्ध करून अनेक वेळा टाळ्या वाजवण्यासाठी भाग पाडले हे विशेष आज पर्यंत अनेक क्रांतिकारक पुस्तक नाटक चित्रपट लिखाण झाले.

पण या वि दा सावरकर क्रांतीकारक च्या घरातील महिलांना काय काय यातना सहन कराव्या लागल्या होत्या याचा ज्वलंत व थरारक उदाहरण आज पर्यंत शासन सर्व जनतेसमोर समाज समोर कधी आले नाही ते या त्रिवेणी नाटकांच्या माध्यमातून समोर येत आहे असेच वाटते काही वर्षांपूर्वी देशाचे तात्कालीन पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या कडून वि दा सावरकर यांच्या बद्दल काही ओळी ऐकल्या होत्या त्या सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप ,सावरकर माने तर्क ,सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर , सावरकर माने तलवार, विनायक दामोदर सावरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या घरातील स्त्रियांना परकीय तसेच स्वकीयां पासून किती त्रास आतना सहन कराव्या लागल्या याची प्रतिकृती हे त्रिवेणी नाटक नृत्यनाटकातून तब्बल दोन ते अडीच तास अंगावर शहारे आणणारे थरारक यशोगाथा सादर करणाऱ्या कलाकारांना गंगाखेड शहरवासीयांच्या वतीने मुजरा करण्यात आला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड शहरातील महिला व पुरुष यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व उद्घाटन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निखिलभाऊ लातूरकर,महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी सुपेकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष विलासराव कौसडीकर,नांदेड जिल्हा अध्यक्ष विजय जोशी ,परभणी जिल्हा अध्यक्ष शंकरराव आजगावकर, आदींच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती पद्मजाताई महातपुरीकर,डॉ.भाग्यश्रीताई भरड, महिला तालुकाध्यक्ष राणीताई राखे, शहराध्यक्षा श्रद्धाताई बोरफळे, सीमाताई देवळे,अँड.स्मिताताई देशमुख, नीताताई भरड,प्रज्ञाताई पाठक, अर्चनाताई जोशी,जिल्हा उपाध्यक्ष वेदशास्त्रसंपन्न श्रीधर जोशी,गजाननदेव जोशी,तालुका अध्यक्ष रत्नाकरराव जोशी,डॉ.संजय भरड,शहराध्यक्ष अँड.राजेश देशमुख, धोंडोपंत राजेंद्र,महासचिव अजय सुपेकर,डॉ.मोहनराव कुलकर्णी,देवानंद जोशी,नागेश केरकर,रामजी कासंडे, विशेष सहकार्य अतुल तुपकर,मिथिलेश तुपकर,नागेश पैठणकर आदींनी केले या कार्यक्रमास सुप्रसिद्ध कलाकार आर्टिस्ट संतोष पाठक यांनी वि दा सावरकर यांचे डिजिटल आकर्षक रांगोळी काढून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाला गंगाखेड शहर व परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला त्यामुळे त्यांची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आभार मानून त्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे अशा स्वरूपाचा कलाकृती आणखीनही आपणास मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले