हिंगणघाट तालुक्यातील दोंदुडा बांमर्डा येथे रक्तदान शिबीर

40

✒️हिंगणघाट(पुरोगामी संदेश नेटवर्क)

हिंगणघाट(दि.9जुलै) तालुक्यातील दोंदुडा – बांमर्डा ग्राम पंचायत येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने रक्त दान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोना माहामारी प्रसंगी सर्वत्र रक्ताची गरज लक्षात घेऊन गावातील युवकांनी स्वखुशीने रक्तदान केले .यावेळी वर्धा रक्तपेढीची वैद्यकीय टीम , ग्रामीण रुग्णालय वडनेर चे आरोग्य कर्मचारी आणी रक्तदान करणारे दाते ,गट ग्रामपंचायत सरपंच गौरव उगे , पोलीस पाटील गणेश इंगोले , राका तालुका उपाध्यक्ष शरद कुलसंगे , आशीष ढगे तालुका सर्चिटनिस उपस्थित होते.