प्रा राम मेघे इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्ट येथे निरोगीपणा आणि आरोग्य मूल्यमापन शिबीराला उत्स्फूर्थ प्रतिसाद

25

✒️बडनेरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बडनेरा(दि.5नोव्हेंबर):- येथील प्रा राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनॅजमेन्ट, बडनेरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि रेड रिबीन क्लबद्वारे महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमा अंतर्गत दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ दरम्यान महाविद्यालय परिसरात महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वर्ग, शिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आरोग्य तपासणी निमित्य “निरोगीपणा आणि आरोग्य मूल्यमापन शिबिरचे” आयोजन करण्यात आले. उपस्थतींना शिबिराबद्दल माहिती व मान्यवरांचे स्वागत करीत शिबिराचे अनौपचारिक उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य डॉ. एम. एस. अली

उपप्राचार्य प्रा पि व्ही खांडवे, टरनिंग पॉईंट फिटनेस अँड ब्रेकफास्ट स्टुडिओ अमरावतीची टीम नेहा डांगे, उमाकांत डांगे, रेखा मैय्यर्, गौरव सांभे, अल्फाझा शेख तसेच विभाग प्रमुख डॉ दिनेश हरकूट, डॉ प्रीती खोडके, डॉ काश्मिरा कासट, डॉ आशिष कडू, प्रा अमित मोहोड आणि महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वर्ग, शिकेत्तर कर्मचारी, ऑफिस कर्मचारी आणि साफसफाई महिला कामगार व उपस्थित विद्यार्थी यांनी शिबिराचा लाभ घेत उपस्थिती दर्शविली. सदर शिबिरात टरनिंग पॉईंट फिटनेस अँड ब्रेकफास्ट स्टुडिओ अमरावतीची चमूद्वारे उपस्थितांचे पूर्ण बॉडी फॅट व सुदृढ शरीराबाबत चे मूल्यांकन करण्यात आले तसेच दुसऱ्या सत्रात श्री आनंद गजभिये यांनी उपस्थतींना निरोगी शरीर व आरोग्य मूल्यमापन बाबत मार्गर्दर्शन व चर्चा केली.

कार्यक्रमांचे आयोजन रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सायवान यांनी महिला कार्यक्रम अधिकारी प्रा गायत्री बहिरे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम कदम , प्रा. अतुल डहाणे, प्रा. अनुराधा इंगोले, प्रा. आशुतोष उगवेकर, प्रा अपर्णा खैरकर, श्री जगदीश, श्री डी आर इंगोले, तसेच रासेयो दूत आयुष भगत, यांच्या सहभागाने केले तसेच शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिकेत्तर कर्मचारी तसेच रासेयो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॅडव्होकेट. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. हेमंतजी देशमुख, सचिव श्री. युवराजसिंगजी चौधरी, सन्माननिय सदस्य श्री. शंकरराव काळे, श्री. नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.