अब्रूची व्याख्या व अब्रूनुकसान कायदा

33

आ.गुलाबराव पाटील यांचेवर मंत्रीं खडसें नी अब्रूनुकसानीचा दावा केला.मंत्रींनी अल्पकाळात कर्ज मिळवले असा आरोप केल्याबद्दल,न्यायालयाने दाखल करून घेतला.अशी माहिती माध्यमांनी प्रसारीत केली.आरोप खरे कि खोटे यांची पडताळणी न करता. कोर्टाने अब्रूनुकसानीचा खटला दाखल करून घेतला.
आता जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर खरेदीचा अपहार उघडकीस आणल्याने सिव्हिल सर्जन ची अब्रू गेली.अर्थात कोणी चोरली किंवा घेतली नाही. अब्रूच्या पोतडीची गाठ सुटल्याने हवेत उडाली. त्यांनी अब्रूचा दावा तीन समाजसेवकांवर केला आहे.अब्रूची किंमत तीन कोटी लावली आहे.एखाद्या ब्रिटिश किंवा अमेरिकन किंवा इंडियन महिलेचा विनयभंग केल्यानंतर कोणत्याही पुरुषाला तीन कोटीची भरपाई द्यावी लागली नाही.पण येथे मागणी केली आहे.या आधीच आठ महिने सिव्हिल सर्जन ने केलेल्या अपहाराची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.दोन महिने आधीच खटला याच कोर्टात दाखल करून घेतला आहे.त्याची सुनावणी न करता आधी अब्रुनुकसानीचा खटला कोर्टाने दाखल करून घेतला.आधी आरोप खरे कि खोटे हे तरी सिद्ध होऊन जाऊ द्या.आरोप खोटे निघाले तर चोराची अब्रूची किंमत लावा.पण कोर्टाला चौरांच्या अब्रूची जास्त चिंता लागून आहे.

कोर्टाला माहिती असली पाहिजे कि चोरांची अब्रू किती? आमदाराची अब्रू किती?मंत्री ची अब्रू किती?आधिकाऱ्याची अब्रू किती?कारकूनाची अब्रू किती?सिपाईची अब्रू किती?सामान्य माणसाची अब्रू किती?यामुळे अब्रूची नुकसानभरपाई चा खटला आला तर खरा किती खोटा किती?याची शहानिशा न करता खटला दाखल करून घ्यावा लागतो.म्हणजे चोराला पकडून देणारा समाजसेवक जेलमध्ये आणि चोर मोकळा चोरी करायला.म्हणून लोक म्हणतात शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये.आम्ही म्हणतो सज्जन माणसाने कोर्टाची पायरी चढू नये.कोर्ट हे चोरांचे आश्रयस्थान बनलेले आहे.
माणसाला किती बायका असाव्यात,किती मुले असावीत,लग्न कोणत्या वयात करावे यावर कायदे करण्याऐवजी अब्रूवर कायदे करणे जास्त आवश्यक आहे.कारण अब्रूचा मोठा व्यापार भारतात केला जातो.धक्का लागल्याने, कट लागल्याने, कपडे फाटल्याने,जातीचा उल्लेख केल्याने अब्रू गमावल्याचे खटले कोर्टात जास्त आहेत.रेती,राशन,दारूच्या करातील उत्पन्नापेक्षा अब्रूच्या देवाणघेवाण मधून मोठे उत्पन्न सरकार ला मिळू शकते.

आता आयपीसी व आयपीसीआर मधे अब्रू ची व्याख्या करणे गरजेचे वाटू लागले आहे.कारण नोकरीतील पगार,व्यापारातील नफा,कारखान्याचे उत्पन्नापेक्षा अब्रू विकून खूप मोठी कमाई मिळू शकते.असे अब्रू विकून मिळालेल्या पैशातून माणसाला प्रतिष्ठित ,सन्माननिय,लक्झरीयस जीवन जगता येऊ शकते.विजय मल्या,ललित मोदी,निरव मोदी,मेहुल चोक्सी ,दाऊद इब्राहिम,छोटा राजन यांच्या सारखे वैभवशाली जीवन जगता येईल. अब्रूचे कैपीटल जास्त झाल्यास शेयर विकता येतील.रीयल इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री तशीच अब्रू इंडस्ट्री अनेकांना रोजगार देऊ शकते.चोराने चोरी केली.गाठोडे घेऊन पळत असताना पोलिसाने अडवले.गाठोडे जप्त करून चोर म्हणून गुन्हा नोंदवला.तर तो चोर सुद्धा त्या पोलिसावर अब्रूचा दावा दाखल करू शकतो. कि मी चोरी करतांना मला चोर म्हटले.असाच काहीसा प्रकार जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधे झालेला आहे.अपहार करतांना अडवले आणि भ्रष्ट म्हटले.

म्हणून अब्रू ही संज्ञा मोघम,अध्यारूत, अस्पष्ट न ठेवता त्याची ठोस व्याख्या करणे आवश्यक बनले आहे.कारण तशी तरतूद आयपीसी किंवा आयपीसीआर मधे नसल्याने न्यायाधीश चिंतेत पडले आहेत.

1)अब्रू म्हणजे काय?
2)अब्रूचे प्रकार कोणते?
3)अब्रू मोजण्याचे परिमाण कोणते वापरावे?
4)अब्रू घेण्याची कृती कोणती?
5)अब्रूची भरपाई कोणत्या रूपाने करता येईल?पैसा,धान्य,गोधन किंवा अब्रू वगैरे.
6)सामान्य माणूस,नगरसेवक,पंचायत सदस्य,सरपंच,पंचायत समीती सदस्य,सभापती,जिल्हा परिषद सदस्य,जि.प.अध्यक्ष,आमदार,खासदार,मंत्री ,पंतप्रधान,राष्ट्रपती इ.ची अब्रू किती?ती जाहीर केली जावी.
7)पुरुष व स्री यांची अब्रूची वेगळी किंमत करावी का ?
8)केंद्र व राज्य सरकारने असे विधेयक पारीत केले तर त्याचे एकक किंवा परिमाण निर्धारित करावे. जसे व्होल्ट,अम्पीयर,ज्यूल ,लिटर,मीटर,ग्रँम आदी.
9).अब्रूचे रेडी रेक्नर बनवून सरकारी कार्यालयात टांगावे .
1०)अब्रूची भरपाई च्या विनीमयावर इन्कम टॅक्स सारखा “इन्सल्ट टॅक्स” लावण्यात यावा.
11)त्यासाठी डीडी किंवा ई-चलन भरणे सक्तीचे करावे.
12)निवडणूकसाठी उमेदवारी अर्जावर करंट अब्रूचा स्टॉक नमूद करावा.
13)अब्रूदार मयत झाल्यास अब्रूचे वारसदारांना अब्रूचे समान वाटप करावे.
14)मनी बँक ,गोल्ड बँक ,ब्लड बँक सारखी अब्रू बँक स्थापन कराव्यात.म्हणजे अब्रू कस्टडीत सुरक्षित राहू शकते.
15)कोणीही अल्प अब्रूधारक किंवा बिनअब्रू धारक असल्यास त्याला कर्जाने अब्रू मिळावी.
16)अब्रू नुकसानीचा दावा करणाऱ्याची करंट अब्रू तपासल्याशिवाय किंवा तसा अब्रुचा बैलँस तपासल्याशिवाय कोर्टाने दावा दाखल करू नये.
17)अब्रू घेणाऱ्याकडे अतिरिक्त अब्रू आढळल्यास सरकारने जप्त करावी.बिनब्रूधारकांना स्वस्त दराने किंवा मोफत द्यावी.
18)कोणत्याही मंत्रीला नागरिकांनी बेअब्रू समजू नये .
19)बेअब्रू व्यक्तीला सरकारने मंत्री बनवू नये.कोणालाही नोकरीत ठेवू नये.

✒️शिवराम पाटील(9270963122)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव