रोटी खेल पढाई प्यार हर बच्चे का है अधिकारी या घोषणेने बीड शहर दणाणून सोडले

36

🔹बालदिनानिमित्त बालहक्क परिषद व जनजागृती रॅली मोठ्या उत्साहात संपन्न

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.14नोव्हेंबर):- बालहक्क संरक्षण कृती समिती बीड , सरकारी कामगार अधिकारी कार्यालय बीड , श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज आणि महाराष्ट्र लोकविकास मंच यांच्या वतीने बीड शहरामध्ये बालदिनानिमित्त जनजागृती रॅली व बालहक्क परिषद मोठ्या उत्साहात साजरी
जनजागृती रॅली बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल – लोकशाहिर आण्णा भाऊ साठे पुतळा – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या मार्गावर रॅली संपन्न झाली रॅलीमध्ये बालकांनी विविध संदेश जसे रोटी खेल पढाई प्यार हर बच्चे का है अधिकार , शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाच्या या घोषणेने सारे बीड शहर दुमदुमले रॕलीच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामीण विकास केंद्र गोमळवाडा या संस्थेचे अध्यक्ष समिर पठाण यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिफळे वस्ती ता शिरूर कासार येथील उपक्रमशील शिक्षक कैलास तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विवाह, बाल हक्क, महिला हक्क, शिक्षण व शैक्षणिक सुविधा या विषयावर पथनाट्ये सादर करण्यात आले’.

हजारो बालकांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला रॅली च्या समारोपणानंतर बालहक्क परिषदेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजन करण्यात आले यावेळी बालकांनी त्यांचे हक्क व त्यांचे अधिकार याविषयी विविध मागण्यांसह मनोगत व्यक्त केले बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची मुले, बालविवाह बालमजुरी बाल लैंगिक अत्याचार भीक मागणारे मुले स्त्रीभ्रूण हत्या मुला मुलींमधील समानता जेंडर फ्रेंडली वातावरण मुलींच्या वस्तीगृहाची सोय ग्रामीण भागातील शाळेत शिक्षकांची कमतरता, शाळेची दुरावस्था गरीबीमुळे शहरात शिकायला परवडत नाही बालकांसाठी स्वतंत्र ग्रंथालय अनाथ मुलांच्या समस्या कोविड-19 मधील अनाथ झालेले बालक या सर्व समस्या बालकांनी बाल अधिकार परिषदेमध्ये मांडल्या.

या बालहक्क परिषद व जनजागृती रॅलीसाठी नंदकुमार ठाकूर पोलीस अधीक्षक बीड न्या. सिद्धार्थ गोडबोले सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड ,संगीता ताई चव्हाण सदस्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई , प्रज्ञाताई खोसरे सदस्य बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई , सुहासिनी देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी बीड, श्रीकांत कुलकर्णी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड, बाजीराव ढाकणे बीड जिल्हा समन्वयक कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, मनिषा ताई तोकले दत्ता बारगजे संध्या बारगजे अशोक तांगडे अध्यक्ष बालकल्याण समिती बीड, मंगेश जाधव परिविक्षा अधिकारी जिल्हा महिला बाल विकास विभाग बीड, शेखर कानडे माथाडी कामगार अधिकारी, संगीता मकरंद उपायुक्त जात पडताळणी विभाग समाज कल्याण बीड, संतोष वारे, सागर सोनवणे, सोनिया हांगे युनिसेफ, बाल हक्क संरक्षण कृती समितीचे दत्ता नलावडे, ओमप्रकाश गिरी, बाजीराव ढाकणे, बाजीराव गिरी,तत्वशील कांबळे ,कामिनी पवार मिथुन जोगदंड महाराष्ट्र गुरुकुल परिषदेचे पदाधिकारी सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद रॅली संपन्न करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान महाराष्ट्र लोकविकास मंच बीड शहरातील सर्व शाळा महाराष्ट्र गुरुकुल परिषद बीड श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला ता केज सह अनेक मान्यवर मंडळींनी यांनी परिश्रम घेतले.