कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक “बालदिवस साजरा !…

31

🔹प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण विकत घेता येत नाही – सुनिल चौधरी

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि. १४ नोव्हेंबर):- रोजी भावसार गल्ली रविंद्र गजानन भारोटे यांच्या घरी जागतिक बाल दिवस साजरा करण्यात आला. कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे कु.पार्थ सागर भारोटे या बालकाला मामा च्या गावाला जाऊया..! हा ग्रंथ भेट देण्यात आला. याप्रसंगी सौ.वृषाली सागर भारोटे, कु.आराध्या भारोटे, बाबा रविंद्र गजानन भारोटे, आदी उपस्थित होते.

प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण विकत घेता येत नाही !…असे गौरवोद्गार कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा.सुनिल भाऊ चौधरी यांनी काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर भारोटे यांनी केले तर आभार सौ.वृषाली सागर भारोटे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनिष चौधरी, गौरव चौधरी, ओम कोळी, अरविंद चौधरी यांनी परीश्रम घेतले.