✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)

मो:-9545619905

अमरावती(10जुलै):-भारतीय जनता पार्टी ने गुरुवारी घोषित केलेल्या जिल्हा कार्यकारिणी मध्ये सदस्य म्हणून येथील निष्ठावान कार्यकर्ते सुनील भाऊ जवंजाळकर यांची नियुक्ती केली आहे.अनेक वर्षांपासून सुनील जवंजाळकर भाजप पक्षाचे कार्य करीत असून तालुका कार्यकारिणीमध्ये देखील ते पदाधिकारी होते. तालुका कार्यकरिणीतून थेट जिल्हा कार्यकारिणी मध्ये त्यांची वर्णी लागली आहे. जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी ही नियुक्ती केली असून जवंजाळकर यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तळागाळातील कार्यकर्त्यांना भाजपने यावेळी जिल्हा कार्यकारिणीत स्थान दिले आहे. पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार्या तसेच अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांना नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.भाजप ने संघटनात्मक कौशल्य असणाऱ्या सुनील जवंजाळकर यांनाही कार्यकारिणीत स्थान दिले असून जिल्हा कार्यकारिणीमध्ये नांदगांव पेठ मधील ही एकमेव नियुक्ती आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल नांदगांव पेठ येथील भाजपचे रमेश उपाध्याय, साहेबराव आमले,संजय पकडे,दिनकर सुंदरकर,निलेश अग्रवाल, ओमप्रकाश बजाज,बाला पांढरीकर, जयंता काळीकर,रविंद्र भगत,संजय मुळे, सुमित काकानी, अमोल व्यवहारे, रवी चोपकार, सुरेश गाढवे,अनुप भगत, सचिन जोशी, सुनील लोहोटे, संजय पोकळे,आदी भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

अमरावती, महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED