कोरोनाच्या उपाय योजनांवरील कामात अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही:-खासदार अशोक नेते

29

🔹खरीप हंगामात शेतकरी बांधवाना त्रास झाल्यास समबंधीत अधिकाऱ्यांना माफी नाही:-आ.बंटी भांगडीया

🔸चिमूर येथे कोविड १९ व खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

🔹खासदार अशोक नेते व आमदार बंटी भांगडीया यांची उपस्थिती सर्व प्रशासकीय अधिकारी यांचा घेतला आढावा

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(10जुलै):-महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहे त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात आढळत आहेत त्यामुळे चिमूर तालुक्यात बाहेर ठिकाना वरून येणाऱ्या प्रत्येक नागरीकांची योग्य तपासणी करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवावे,शहरी तसेच ग्रामीण क्षेत्रात जातीने लक्ष द्यावे जेणेकरून कोरोनाला योग्य आळा घालता येईल ह्या सर्व उपाययोजना राबविताना समबंधीत अधिकाऱ्यांनी बेजबाबदार पणा केल्यास तो खपवून घेणार नाही असे चिमूर गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी ठणकावून सांगितले त्याचबरोबर केंद्र सरकारच्या विवीध जनकल्याणकारी योजनांची योग्य अंमलबजावणी करावी असे अधिकारी यांना आढावा बैठकीत खासदार नेते यांनी सांगितले.

666 सध्यां खरीप हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आपल्या शेतीच्या हंगामात व्यस्त आहेत या वर्षी कोरोनामुळे शेतकरी बांधवांना आपला शेती माल योग्य वेळेत विकता आला नाही त्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे,महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या नियोजनाअभावी या वर्षी योग्य बियाणे शेतकऱ्यांना मिळू शकले नाही राज्यात सध्या खतांचा तुटवडा जाणवत आहे चिमूर तालुक्यात कुठेही खतांचा कमी पडणार नाही याची कृषी विभागाने दखल घ्यावी.तालुक्यात युरिया खतांची खरेदीसाठी शेतकरी कृषी दुकानांत जात असता इतर खत विकत न घेतल्यास फक्त युरिया खत मिडणार नाही असे सांगितले जात आहे,कृषी अधिकारी यांनी अशा कृषी केंद्राची व युरीच्या साठ्याची माहिती घेऊन अशा कृषी केंद्रावर तात्काळ कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावे अशा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.कोरोनाच्या काळात शेतकरी बांधवांना त्रास होता कामानये असे आढळुन आल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असेही ठणकावून सांगितले.999

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व जगभरात हाहाकार सुरू असून देशात महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आहे,शहरी भागासोबतच कोरोनाचा घेराव हा ग्रामीण क्षेत्रात पण झालेला आहे.सध्या ग्रामीण क्षेत्रात शेतीचे खरीप हंगाम सुरू आहे त्या अनुसंगाने आज चिमूर येथे शहीद बालाजी रायपूरकर सभागृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला,कृषी,बँक,सहकारी संस्था,वन विभाग,महसुल विभाग, पंचायत समिती,आरोग्य अशा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.बैठकीचे आयोजन उपविभागीय अधिकारी चिमूर यांनी केले होते.
या बैठकीला चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार(बंटी) भांगडीया यांची उपस्थिती होती.

यावेळी चंद्रपूर जिल्हापरिषद उपाध्यक्षा सौ.रेखाताई कारेकार,भाजपा जेष्ठ नेते वसंत वारजुकर,भाजपा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्यामजी हटवादे,माजी सभापती प्रकाश वाकडे,विधानसभा प्रमुख निलमजी राचलवार,जिल्हा परिषद सदस्य मनोज मामीडवार पंचायत समिती सदस्य,अजहर शेख,पंचायत समिती सदस्य अजहर शेख,उपविभागीय अधिकारी चिमूर संपकाळ साहेब,तहसीलदार चिमूर नागतीळक,चिमूर पोलिसस्टेशन ठाणेदार स्वनिल धुळे, वसंत वारजूकर डॉ श्यामजी हटवादे निलम राचलवार राजू देवतळे, किशोर मुंगले व सर्व प्रमुख पदाधिकारी व सर्वविभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.