वृक्ष संवर्धना करिता जय शिवराय वृक्ष संवर्धन समिती ची स्थापना

33

🔹मारोडा ग्रामपंचायत सदस्य रोशन कोहळे यांचा पुढाकार

✒️चामोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चामोर्शी(दि.12जानेवारी):-जिल्हा परिषद हायस्कूल चामोर्शी यांच्या नेतृत्वात व रोशन कोहळे ग्रा.पं. सदस्य यांच्या पुढाकाराने मारोडा येथे काही महिन्यापूर्वी वृक्षांची लागवड करण्यात आली . कुमार रोशन कोहळे यांनी युवकांच्या माध्यमातून वृक्षांची देखभाल करून त्यांना मोठे केलं .यापुढे गावात हिरवळ नांदावी, गावातील नागरिकांना वृक्षा संदर्भात आपलेपणाची भावना निर्माण व्हावी. तसेच गावात व सभोवताली शिक्षणाची आवड असणारे काही गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं आहेत ते शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ग्रामपंचायत सदस्य रोशन कोहळे यांनी पुढाकार घेऊन *जय शिवराय वृक्ष संवर्धन समिती मारोडा* स्थापन केली या समितीच्या माध्यमातून देणगी रूपात पैसा गोळा करून समाजकार्यात मदत करण्याचा हेतू रोशन कोहळे यांनी ठेवला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कलागुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम व विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे .वृक्ष संवर्धनाचा वसा साऱ्या गावकऱ्यांनी मिळून जपावा. या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपून सर्व गाव एक होऊन विविध उपक्रम साजरे करण्यात येतील असे आवाहन रोशन कोहळे ग्रामपंचायत सदस्य मारोडा यांनी केले आहे.

जिल्हा परिषद हायस्कूल यांनी मारोडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडून वृक्षाबद्दलची आपुलकी मारोडा वासियात निर्माण केल्यामुळे पूर्ण गावकरी वासियांकडून जिल्हा परिषद हायस्कूल चामोर्शी येथील *मुख्याध्यापक तालापल्लीवार सर व सर्व शिक्षक वृंद* व विद्यार्थ्यांचे तसेच यात मदत करणाऱ्या युवकांचे आभार मानले .या उपक्रमाची सुरुवात मी माझ्या गावातून करतो आहे त्यामुळे यशस्वी झाल्यास पुन्हा काही गाव दत्तक घेऊन अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवणार अशी ग्वाही रोशन कोहले यांनी दिली आहे .

*विविध संस्थांनी प्रतिष्ठित नागरिकांनी व दानवीरांनी सामोर येऊन वृक्ष संवर्धनासाठी व गोरगरीब शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांसाठी देणगी देऊन मदत करावी अशी विनंती ग्रामपंचायत सदस्य रोशन कोहळे यांनी केली आहे.*