चला पोलीस भरती वर बोलु काही

35

सध्या महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. हजारों जागेसाठी लाखों अर्ज उमेदवारांनी केले आहेत. अनेक वर्षांपासून तरुण नोकरीच्या जाहिराती ची प्रतिक्षा करत होते. पोलीस भरती प्रक्रीयेमुळे काही तरुणांना आशेचा किरण मिळून जगण्याला थोडेफार का होईना पण बळ मिळत आहे. पोलीस भरती या प्रक्रियेकडे गांभीर्याने बघितलं तर बेरोजगारी, मेहनत, तडजोड याची जाणीव होते. परंतू आपण मागील काही वर्षापासून महत्वाच्या मुद्यांवर चर्चा न करता शुल्लक विषयावर चर्चा होत आहेत कि ज्या विषयावर चर्चा झाली काय आणि नाही झाली काय त्यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जिवनावर काहीही परिणाम होत नाही.हल्लीच्या चर्चेमधुन महागाई, शिक्षण, बेरोजगार, आरोग्य आणि शेतमालाला भाव हे मुद्देच बाजूला गेले आहेत. धर्म, रंग, आणि वैयक्तिक कपड्यावर सध्या बोलूनच उघवलेला दिवस माळवत आहे. आपण दोनच उदाहरणे बघितले तर आपल्या लक्षात येईलच. पठाण चित्रपटाचे गाणे रिलीज झाले आणि शाहरुख खानला विरोध सुरू झाला. शाहरुख खानला विरोध करण्यामागे तार्किक काय कारण होते हे अजूनही लोकांना कळाले नाही.

भगव्या रंगाला धर्माचा मुलामा चढवून चुकिची माहिती पसरवून निव्वळ धार्मिक द्वेषाने गेल्या काही दिवसापासून चर्चा, मुलाखती सुरू आहेत. भगवा रंग वापरून बोल्ड सिन अगोदरही खूप वेळा दाखवले गेलेले आहेत तरी फक्त शाहरुख ला विरोध हे तार्किक नव्हते. दुसरा विषय सध्या सुरू आहे तो उर्फी जावेद चा तोडके कपडे घालण्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता कोणी कसे आणि कोणते कपडे वापरायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक विषय असताना कपड्यावर बोलुन वेळ वाया घालून काहीच उपयोग नाही. पण धर्मनिरपेक्ष देशामध्ये धर्मावर चर्चा होतात. बर धार्मिक संघटना, यांनी एखाद्या वेळी धर्माच्या मुद्यावर बोलले तर समजून घेऊ. दोन धार्मिक संघटने मध्ये काही मतभेद असतील तर सरकारच्या मदतीने ते मिटवले जाऊ शकतात परंतु येथे सगळं उलट आहे. येथे धार्मिक बाबींवर बोलुन धार्मिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार मध्ये असलेले आणि सरकारच्या पक्षात असलेलेच लोक करत असतील तर मग मध्यस्थी करून वाद कोणी मिटवायचा आणि सरकार मध्ये असलेल्या लोकांनी जर धर्मावर बोलुन वेळ वाया घालायचा तर रोजगार शिक्षण आरोग्य महागाई ह्या गोष्टींवर कोणी बोलायचे हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

रोजगार,शिक्षण,आरोग्य आणि महागाई यावर जर चर्चा झाली आणि उपाय शोधले तर सर्वांना फायदा होतो. परंतु सध्या सुरू असलेल्या चर्चेमधुन फक्त चँनल्सवाल्यांना फायदा मिळत आहे. म्हणून महाराष्ट्रात पोलीस भरती सुरु असुन कोणत्याही राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष गांभीर्याने लक्ष दिले नाही. आता काहींच्या मनात प्रश्न असेल भरती प्रक्रिया सुरू आहे प्रशासन त्यांचे काम करत आहे. मग नेते आणि इतरांनी लक्ष देण्याची काम गरज. परंतु लक्ष दिले तर वास्तविक परिस्थिती समजते. म्हणून आपण ओझरते जरी बघितले तरी खुप चिंताजनक बाब आपल्या लक्षात येते.

अनेक वर्षांपासून भरती नसल्याने अनेक तरुणांचे वय निघून गेले. अनेक तरुण घरची परिस्थिती हलाखीची असल्याने औद्योगिक कंपन्यामध्ये जाऊन कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी मेहनत करत आहेत. वय निघून गेलेले बेरोजगार आणि औद्योगिक कंपनी मध्ये काम करणाऱ्यांना मैदानावर तयारी करायला मिळत नाहीत असे आपण एकुण आकडेवारी बघितली तर लाखोंच्या संख्येत आहे. थोडक्यात काय तर लाखों तरुण काही वैयक्तिक तर काही आर्थिक कारणाने सध्या होत असलेल्या पोलीस भरथीचे उमेदवारी अर्ज भरू शकले नाही. अठरा हजाराच्या वर जागेसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु आपण ठोबळमानाने विचार केला तर अठरा हजार जागेसाठी अकरा लाखाच्या वर उमेदवारी अर्ज आले आहेत. आता हे जे उमेदवारी अर्ज आलेले आहेत ते फक्त मैदानी तयारी करणाऱ्या तरुणांचे आहेत. काही तरुणांनी तारीख लवकर जाहीर होत नाही म्हणून मैदानी तयारी करणे सोडून आणि उमेदवारी अर्ज भरले नाहीत ते वेगळे. अठरा हजार जागेसाठी अकरा लाखांच्या वर अर्ज आणि त्यातही उच्च शिक्षीत तरुणांचे अर्ज ही बाब खुप गंभीर आहे.

कोणतीही नौकरी कमी दर्जाची मुळीच नाही. परंतु प्रश्न हा आहे जे शिक्षण घेऊन तरुणांनी अधिकारी होऊन समाजासाठी ध्येय धोरणे बनवून सर्वांगीण हिताचे काम करायला पाहिजे होते ते तरुण कर्मचारी बनुन बनवलेल्या धोरणावर फक्त नोकरी मिळून कुटुंब चालावे म्हणून काम करतील. समाजातील बुद्धीजीवी वर्ग जर फक्त पोटाची खळगी भरेल म्हणून पहिल्याच पायरी वर राहीला तर सर्वात वरच्या पायरीवर बुद्धीजीवी लोकांची कमतरता निर्माण होऊन शिक्षणाप्रती निराशा निर्माण होऊन. पदवीधर होऊन पोलीस कर्मचारी होण्यापेक्षा बारावीच करून पोलीस कर्मचारी होण्यास काय अडचण आहे. असा साधा प्रश्न तरुणांच्या डोक्यात यायला वेळ लागणार नाही. म्हणून सदर बाब खूप गंभीर असुन लक्ष वेधण्यालायक आहे तरीही कोणी या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही. अकरा लाखापेक्षा जास्त आकडा हा फक्त पोलीस भरती ची तयारी करणाऱ्यांचा आहे. अजूनही यापेक्षा जास तरुण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आहेत ज्यांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला नाही. ढोबळ मानाने विचार केला तर पोलीस भरती मधील दहा लाख ऐंशी हजार तरुण बेरोजगार, ज्यांना वयामुळे भरता आले असे लाखों तरुण, तारिख जाहीर होत नाही म्हणून ज्यांनी पोलीस भरती ची अपेक्षा सोडून दिली असे लाखो तरुण, आपण असा ठोबळ मानाने विचार केला तर पंचवीस लाखांच्या वर फक्त तरुणांनाचा आकडा जातो. मग एवढ्या तरुणांच्या उदरनिर्वाहासाठी सरकारची काय भूमिका असायला पाहिजे, सरकारने काय नियोजन केले आहे, या विषयावर चर्चा का होत नसेल.

उर्फी शॉर्ट कपडे घालते त्या ऐवजी लाखो तरुणांना कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत यावरही बोलायला पाहिजे. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहून होण्याऱ्या वादावर चर्चा केल्या पेक्षा लाखों तरुणांना लग्नासाठी मुलीच मिळत नाही हा विषय महत्त्वाचा नाही का? आज राजकीय नेते सुद्धां चर्चा करताना अर्धवट माहिती च्या आधारे विषय वाढतात व महत्वाचा विषय बाजूला सारतात. कोणताही द्वेष, पुर्वग्रह मनात न ठेवता सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणण्याची नितीमत्ता हि नेतृत्वाकडे पाहिजे असते. दोन तीन वर्ष रिलेशनशिप मध्ये राहून दोघांच्या वैयक्तिक कारणाने एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे परंतु गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार मुस्लिम असेल तर त्याला लव वेगळे स्वरूप देणे चुकिचेच आहे. बर मागे जे श्रद्धा प्रकरण मिडिया सह काही राजकाऱ्यांनी गाजवले आणि लवजिहाद वर बोलत होते ते फक्त आरोपी चे नाव ऐकून. आरोपीचे नाव आफताब होते म्हणून लव जिहाद वर भर दिला परंतु आफताब हा मुस्लिम नाही याची माहिती किती लोकांना आहे. आफताब पुनावाला असे त्याचे होते. अर्थात गुन्हेगारांना जात धर्म नसते परंतु राजकीय आणि जबाबदार लोक जर गुन्हेगारी मध्ये जात आणि धर्म शोधत असतील आणि विशिष्ट जातीधर्माचा द्वेष आणि तिरस्कार म्हणून विरोध करत असतील तर हे चुकिचेच आहे.

आज देशातील परिस्थिती खुप बिकट झाली आहे. ज्वलंत विषयावर चर्चा न करता, ज्वलंत समस्येवर उपाय योजना न करता. जो विषय मुळात चर्चेचा नाही त्याला ज्वलंत केले जाते. आणि ज्यांनी देशातील , राज्यातील, आपल्या मतदार संघातील जनतेला प्राधान्य क्रम देऊन काम करण्याची अपेक्षा असताना जनतेचा विचार न करता धर्माचा विचार करून जनतेलाच भटवले जाते हि खुप मोठी शोकांतिका आहे. आणि सत्य व ज्वलंत विषयावर चर्चा होऊन त्या विषयाचे गांभीर्य जनतेपर्यंत जायला पाहिजे. म्हणून लव जिहाद, रंग आणि कपडे यावर गोंधळ करून झाला असेल तर पोलीस भरती फक्त एक निमित्त आहे. बेरोजगारी आणि बेरोजगार तरुण व त्यांच्या कुटुंबाला येणाऱ्या अडचणी यावर बोलले, जाणुन घेतले तर ज्याला मन आहे त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतीमध्ये काम करणे आज हीनपणाचे मानले जात आहे, शिकुन सुद्धां नौकरी मिळत नाही म्हणून लाखों तरुणांचे विवाह सुद्धा होत नाही हा तर खुप चिंतनाचा विषय आहे पण यावरही कधी चर्चा होत नाही.

उमेदवार जास्त जागा कमी असल्याने अनेक तरुण तरुणींना नैराश्य येईल. पण खचून जायच नाही, कारण तुम्ही घेतलेली मेहनत, केलेली तडजोड ही खुप मौल्यवान आहे, आणि आपल्या मेहनतीला व तडजोडीला यशस्वी करायचे असेल तर तरुण तरुचींनी खचून न जाता मेहनतीवर विश्वास ठेवून अर्थाजन करण्याचें वेगवेगळे परंतु संविधानीक मार्ग निवडणूक वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा निर्माण करण्याची ताकत ठेवावी. सत्याची जाणीव होण्यासाठी चला पोलीस भरतीवर बोलु काही.
*************************************
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगाव,ता.मेहकर)मो:-9130979300
*************************************