चंद्रपुर मध्ये पहिल्यांदा ङिजिटल मीङिया ची पत्रकार परिषद

    37

    ✒️चंद्रपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(15जुलै):-आज पर्यंत वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनींसाठी पत्रकार परिषद झाल्यात. आज पहिल्यांदा चंद्रपूरात खास ङिजिटल मीङियासाठी पत्रकार परिषद झाली. कोरोनानंतर झपाट्याने बदललेल्या परिस्थितीमुळे वृत्तपत्राच्या पत्रकारांना कमी करून छोटी कार्यालये केली जात आहे. अनेक गावात, गल्लीत, दुर्गम भागात आजही वृत्तपत्र पोहोचू शकला नाही. अशावेळी सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी ङिजिटल मीङिया सक्षमपणे उभी होत आहे. या पत्रकारितेत ङिजिटल मीङियाने व्यापक रुप घेतले आहे. ही पहिली पत्रकार परिषद खेङ्या गावातील गरिब कुटुंबानं घेतली. याचा अर्थ भविष्यात नवीन मीङिया सामान्यांसाठी हक्काचं व्यासपीठ ठरेल.