चंद्रपूर शहरात संक्रमीत व्यक्तींचा शोध घेण्यासाठी 17 जुलै पासून लॉक डाऊन

28

नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी कुणाल खेमणार

घराबाहेर पडाल तर कारवाई : डॉ. महेश्वर रेड्डी

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16जुलै): चंद्रपूर शहरामध्ये आतापर्यंतच्या 218 पैकी 60 रुग्ण शहरातील आहेत. त्यामुळे शहरात अधिक संक्रमण होऊ नये, शहरात संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी आजपासूनचा लॉक डाऊन अर्थात टाळेबंदी सुरू करण्यात आली आहे. ही जनतेसाठी सुरू करण्यात आलेली टाळेबंदी असून दुप्पट रुग्ण होण्याच्या गतीला यामुळे खीळ बसणार आहे. यासाठीच जनतेने घराबाहेर न पडता प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

तर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घराबाहेर पडाल तर कारवाई करू असे स्पष्ट केले आहे. शहरातील जनतेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि कोरोना पासूनमुक्ती मिळण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा बंद आवश्यक असून त्यासाठीच लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे.त्यामुळे जिवापेक्षा मोठे कोणतेही कारण नाही. तेव्हा घराबाहेर पडू नका, असे आवाहन रेड्डी यांनी केले आहे.

आज या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात व्हिडिओ संदेश जारी करताना कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कोरोनाचा प्रसार नगण्य करण्यासाठी हा लॉकडाऊन अचानक सुरू करण्यात आलेला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी 7 ते 10 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा कडकडीत बंद अर्थात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील डब्लिंग रेट आणखी कमी करण्यासाठी ही उपाययोजना योजना आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या एक लक्षात आले असेल की, गेल्या 10 दिवसात अचानक 200 पर्यंत आपले रुग्ण पोहोचले आहेत. कधीकाळी आपल्याकडे एकही रुग्ण नव्हता. परंतु गेल्या दहा ते वीस दिवसांमध्ये झपाट्याने रुग्ण संख्या वाढत आहे. ही रुग्ण संख्या वाढवण्याची साखळी सोडण्यासाठी ही उपाय योजना आहे. याशिवाय पुढील दहा दिवस महानगरपालिकेकडून संसर्ग थांबविण्यासाठी युद्धपातळीवर तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये तात्काळ माहिती देणाऱ्या अॅन्टीजेन तपासणीचा अधिक वापर केल्या जाणार आहे.त्यामुळे पहिल्या पाच दिवसांच्या लॉकडाऊनला कोणीही घराच्या बाहेर पडू नये.

घरात ज्याला कोणाला लक्षणे दिसेल त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाशी, महानगरपालिकेशी किंवा 1077 व 07172 -261226 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

सक्त कारवाई करु : डॉ.महेश्वर रेड्डी

संपुर्ण 10 दिवस शहरात कडक बंदोबस्त असेल,बाहेर पडाल तर कारवाई होईल. लॉकडाऊन दरम्यान, बाहेरून येण्यासाठी असणारे शहरातील सर्व रस्ते बंद असतील. जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये 10 दिवस येवू नये,आपल्या आरोग्यासाठी हा लॉकडाऊन असून त्याचे सक्तीने पालन करा,असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

लॉकडाऊनसाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांना जिल्ह्यात व जिल्ह्यातून इतर ठिकाणी जाता येणार नाही.लॉकडाऊन दरम्यान सर्व पोलिसांची पेट्रोलिंग होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असणार आहे. प्रशासनाच्या सूचना उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

वैद्यकीय बाबी व दूध विक्रेते तसेच डब्ल्यूसीएलचे कर्मचारी, थर्मल पावर स्टेशनमध्ये काम करणारे कर्मचारी यांना मुभा असणार आहे. तसेच शासकीय कर्मचारी पास दाखवून आपल्या कामाच्या ठिकाणी दाखल होऊ शकतात.

पोलीस योद्धा म्हणून पोलिस प्रशासनाने सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. युवक-युवतींनी जास्तीत जास्त पोलिस योद्धा म्हणून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर पोलीस प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी.

चंद्रपूर, दि. 16 जुलै : चंद्रपूर शहरामध्ये आतापर्यंतच्या 218 पैकी 60 रुग्ण शहरातील आहेत. त्यामुळे शहरात अधिक संक्रमण होऊ नये, शहरात संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी आजपासूनचा लॉक डाऊन अर्थात टाळेबंदी सुरू करण्यात आली आहे. ही जनतेसाठी सुरू करण्यात आलेली टाळेबंदी असून दुप्पट रुग्ण होण्याच्या गतीला यामुळे खीळ बसणार आहे. यासाठीच जनतेने घराबाहेर न पडता प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.