रामेश्वर तिरमुखे लिखित “गुरू रविदास संत कबीर दोहे व अर्थ” पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाशन

41

✒️जालना(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जालना(दि.24,फेब्रुवारी):- लेखक रामेश्वर तिरमुखे लिखित गुरू रविदास संत कबीर दोहे व अर्थ पुस्तकाचे ज्येष्ठ सत्यशोधक तथा लेखक प्रा.जी. ए.उगले ,आष्टी बीड येथील शिक्षणतज्ञ सोमनाथ वाळके सर,महिला महाविद्यालय परभणी येथील प्रा डॉ निर्मला जाधव, राज्यआदर्श शिक्षक गजानन वाळके,सरपंच संदीप भवर ,श्रीमती कस्तुरबाई तिरमुखे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय खोरे, विवेकसेठ गिल्डा यांच्याहस्ते यशवंत व्याख्यानमालेत संपन्न झाले. पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करतांना लेखक रामेश्वर तिरमुखे यांनी गुरू रविदास व संत कबीर यांचे दोहे हे भारतभर गायले जातात.संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे हे दोहे ही अतिशय मार्गदर्शक आहेत.

या दोन्ही संतांचा परिचय व्हावा आणि त्यांचे निवडक समाजउपयोगी दोहे आपल्या वाचनात यावे म्हणून हे पुस्तक लिहिले आहे. दैनंदिन जीवनात आपण सकारात्मक वृत्तीने आचरण करण्यास हे पुस्तक मदत करते. आपल्या घरात नियमितपणे हे दोहे वाचन व्हावे,त्यांचा मराठीत दिलेला अर्थ आणि उदाहरणे ही निश्चितच मार्गदर्शक आहे.या दोन्ही संतांचे दोहे हे गुरुग्रंथसाहेब ग्रंथात समाविष्ट असून शीख बांधव त्याचे नियमितपणे वाचन मनन चिंतन करतात.त्यामुळे ते प्रगतीच्या वाटेवर आहेत.विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील हे कबीरपंथी होते.डॉ आंबेडकर यांनी त्यांना गुरू मानले आहेच.तसेच त्यांनी त्यांचा “द अनटचेबल” हा ग्रंथ गुरू रविदास व संत कबीर यांना अर्पण केला आहे. पुस्तकाची पाठराखण मेळघाट येथील पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे यांनी केलेली आहे,ज्यात ते पुस्तक जास्तीतजास्त वाचकांनी वाचावे असे म्हणतात.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी पुस्तक लेखनासाठी लेखक रामेश्वर तिरमुखे यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक उद्धव बाजड सर यांनी केले,परिचय राजेश भापकर सर यांनी तर सूत्रसंचालन शिवाजी धुपे सर यांनी तर आभार डॉ राहुल बागुल यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंतचे अल्ताफ शेख, डॉ मुरलीधर जाधव,डॉ गोपाल आडानी,श्रीहरी तिकांडे,भगवान राजगुरू सर ,राहुल साळवे सर ,डॉ विनोद वाघळकर सर ,लक्ष्मण बेवले सर,अशोक शिंदे सर,चंदू गायकवाड सर यांनी मेहनत घेतली.