ऐश्वर्या कदम हीस आधार महाराष्ट्र भूषण  व भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्काराने सन्मानित

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.24फेब्रुवारी):- कोयनानगरची कन्या कु .ऐश्वर्या एकनाथ कदम हिस नृत्य कलेतील प्रशिक्षक म्हणून तिच्या कार्याची दाखल घेऊन सरपंच परिषद मुंबई यांचे वतीने भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्काराने तर मुंबई महाराष्ट्र स्पोर्ट्स फौंडेशन व आधार फौंडेशन यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण 2023 पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. 

         मुंबई महाराष्ट्र स्पोर्ट्स फौंडेशन व आधार फौंडेशन आयोजित आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 रवींद्रनाथ नाट्य मंदिर प्रभादेवी दादर येथे पार पडला .या पुरस्कारासाठी कोयनानगरची कन्या कु .ऐश्वर्या एकनाथ कदम हिस नृत्य कलेतील प्रशिक्षक म्हणून तिच्या कार्याची दाखल घेऊन तिला आज पर्यंत नृत्य कले बाबत मिळालेल्या 230 पारितोषिके व 22 पुरस्कार यांचा विचार करून या संस्थानी निवड आधार महाराष्ट्र भूषण पुरस्कार मा.ज्ञानेश्वर वांगडे व श्रीरंग केरकर या  मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आला . 

        तसेच सरपंच परिषद मुंबई यांचे वतीने भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्काराने ऐश्वर्या कदम हिस भारतीय संविधान जनजागृती रक्षक 2023 मा.नितीन पाटील यांच्या हस्ते तिला प्रधान करण्यात आला पुरस्काराने सन्मानित  सदर मिळालेल्या पुरस्काराबाबत तिचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे