शिवाजी भजन मंडळाचा नांदेड येथे सत्कार

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी (दि. 24 फेब्रुवारी):- तालुक्यातील बेलगाव येथिल संत शिवाजी भजन मंडळ यांचा लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथिल आयोजित ग्रामीण लोककलावंताचा भव्य मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
मागील अनेक वर्षापासून बेलगाव येथिल संत शिवाजी भजन मंडळ गावोगावी जाऊन आपल्या भजन,कीर्तन व समाजप्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत.

नुकताच शिवजयंती उत्सवानिमित्त नांदेड येथे ग्रामीण जनजागृती लोककला शाहीर मंडळ द्वारा‌ आयोजित भव्य लोककलावंताचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यात बेलगाव येथिल अठरा लोकांचा संच असलेल्या शिवाजी भजन मंडळाने सहभाग घेवून भजनाच्या माध्यमातून उत्कृष्ट समाजप्रबोधन केल्याने त्यांना कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नांदेड ग्रामपंचायत चे सरपंच अरुन बावनकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.भजन मंडळाचे संचालक शिवाजी मैंद ,लिंकू अवसरे,दादाजी रामटेके,सुधाकर बांगरे,सोमेश्वर वांढरे,संजय चोपकार,केवळराम तुपटे,राजू धोटे,धर्मदास तुपटे,प्रतिभा तुपटे,भागवत मेश्राम यांनी मान्यवरांचे आभार मानले.