बेसुमार ब्लास्टिंगमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात;रीपाई ने दिले तहसीलदार यांना निवेदन

43

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.28फेब्रुवारी):- त्रिमली ता. खटाव येथील डी. एच . डी. इंप्रोकल इन्फ्राकाँन प्रा . ली. कंपनी (खडी क्रशर) च्या माध्यमातून गावातील नागरिकांना व शेतकऱ्यांना होणारा त्रास तसेच बेसुमार ब्लास्टिंग मुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून तो खडी क्रशर तात्काळ बंद करणेत यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खटाव नेते गणेश भोसले यांनी तहसीलदार याणा दिलेल्या निवेदनात केली आहे.

त्रिमली तालुका खटाव येथील गट नं. 604 मध्ये डी.एच.डी लि. कंपनी (खडी क्रशर) सुरू असून या क्रशर मुळे गावातील नागरिक व शेतकरी यांचे अतोनात नुकसान होत आहे. या क्रशरच्या शेजारी असणारे शेतकरी यांची विहीर, बोरवेल यांचे पाणी पूर्णपणे कमी झाले आहे. क्रशरच्या ब्लास्टिंग मुळे क्रशर शेजारील गोर गरीब लोकांच्या घरांना तडे गेले आहेत. तसेच गावातील तीन-चार गरीब शेतकऱ्यांच्या ब्लास्टिंगच्या हाद-याने जनावर दगावले आहेत. सन 2018 पासून आज पर्यंत या मालकाने ग्रामपंचायत शासकीय 3% कर अध्याप दिलेला नाही. तसेच या क्रशरच्या मालकाने गौण खनिज उत्खननाचा किती ब्रासची परवानगी घेतले आहे. तसेच गौण खनिज उत्खनन किती झाले आहे. याची ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करून त्याची तपासणी करणेत यावी. ग्रामपंचायतीने वारंवार क्रशर मालकाला तोंडी सांगितली असता की जी ग्रामपंचायत 3% रक्कम जमा करा असे सांगितले असता ग्रामपंचायतीला उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत.

या क्रशरच्या शेजारी असणारे शेतकरी यांचे जमिनीचे व पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी या क्रशरची तात्काळ ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करून त्याने शासनाला चुकविलेला गौण खनिजाचा कर सर्व व्याजासहित दंड करण्यात यावा. तसेच जोपर्यंत मोजणी होत नाही. तोपर्यंत ब्लास्टिंग थांबवण्यात यावे. रात्री अपरात्री ब्लास्टिंग करत असल्यामुळे गावातील 4 वयोवृद्ध ब्लाप्स्टिंगच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडले आहेत.

तसेच या क्रशर मालक दत्तात्रय हणमंत देसाई हा गुन्हेगारी व कायद्याला न मानणार आहे. तसेच पैशाचे जोरावर गावातील गोर गरीब लोकांना ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना खोट्या गुन्हा मध्ये अडकण्याची दाठ शक्यता आहे. तरी या क्रशर मालकामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याला व जीविताला धोका आहे. तरी तात्काळ खडी क्रशर बंद करण्यात यावे. अन्यथा तीन 13/3/2023 रोजी गावातील सरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांना सोबत घेऊन तहसीलदार कार्यालय येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन देताना रिपाई खटाव तालुका अध्यक्ष मा. गणेश भोसले, ता. उपाध्यक्ष संदीप काळे, त्रिमली सरपंच हणमंत सुतार, विक्रम डोईफोडे, विठ्ठल नलवडे, अक्षय पवार, शंकर येवले, विकास येवले, सुनिल वायदंडे, मारूती येवले, हरिदास येवले, नवनाथ माने, श्रीरंग येवले, अश्विन माने, संभाजी माने सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.