रामेश्वर पातसे शिक्षक सुखवासी यांचा आमदार सुभाष धोटे कडून सत्कार

30

🔸32 पट असलेल्या प्राथमिक शाळेत उपक्रम राबिविनारी शाळा म्हणजे सुकवासी शाळा – आमदार सुभाष धोटे

✒️गोंडपीपरी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

गोंडपिपरी(दि.26मार्च):- गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने जि प उ प्राथमिक शाळा सुकवासी ला संगणक उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राजुरा विधानसभेचे आमदार माननीय सुभाष धोटे हे उद्घाटक होते तर प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सरपंच सौ सूनंदाताई मोहुर्ले, गट विकास अधिकारी शालीक माऊलीकर, गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर, तालुका काँगेस अध्यक्ष तुकाराम झाडे, माजी सभापती अशोक रेचनकर, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, अध्यक्ष सरपंच संघटना देविदास सातपुते, तालुकाध्यक्ष महिला रेखा रामटेके, सोनू ढीवसे, श्रीनिवास कंदणुरीवार, धिरेंद्रे नागपुरे, गिरिधर कोटणाके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी, माळी समाज अध्यक्ष बंडूजी आदे, ग्रामसेवक नागरगोजे, गावातील तरुण युवक, महिला गावकरी उपस्थित होते.

सुभाष धोटे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाप्रसंगी शाळेला रंगमंच व दोन कॉम्प्युटर मंजूर केले तसेच शाळेतील उत्साही व उपक्रमशील शिक्षक रामेश्वर पातसे यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच शाळेसाठी नेहमी सहकार्य करणारे देवतळे सर यांचाही शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेत राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. शाळेमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज विध्यार्थी बचत बँक, डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, शालेय वस्तू भांडार, संगणक लॅब, विध्यार्थी ध्वज उपस्थिती, फिरते वाचनालय, वाचन कट्टा, अशा विविध उपक्रमांची पाहणी केली व एवढे उपक्रम रबिविनारी शाळा मी पहिल्यांदाच पाहली अस मत व्यक्त केलं. तसेच लोकसहभागातून शाळेसाठी दोन संगणक खरेदी केली ही बाब तर खूपच उत्तम आहे प्रत्येक शालेनी असा उपक्रम राबविला तर आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी कदापी मागे राहणार नाही.अस मत व्यक्त केलं.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड सचिन फुलझले यांनी केले तर पाहुण्याचे आभार बंडू मोहूर्ले यांनी मानले