गडचांदूर वाहतूक पोलिसाची मनमानी कारभार!-वरिष्ठांच्या आशीर्वादाने वाहतूकदारांन कडून अवैध वसुली जोमात?

29

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

कोरपना(दि.16मे):- तालुक्यातील औद्योगिक नगरी म्हणून गडचांदूर शहराची भारतात ओळख असुन मोठी बाजार पेठ दर मंगळवारी भरते अंदाजीत चाळीस हजाराच्या आसपास या शहराची लोकसंख्या असुन दररोजच लोकांची गर्दी वाहनांची वर्दळ असते आठवडी बाजार पेठ असल्याने बैल, गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, विकण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने या बाजारात येतात. काही शेतकरी आपले जनावरे विक्री करतात, काही शेतकरी जनावरे खरेदी करतात. त्या शेतकऱ्यांचे वाहनं अडवून त्यांना कायद्याची भीती दाखवून त्यांच्या कडून अवैध वसुली करतात अशी चर्चा शेतकऱ्यांन कडून केली जात आहे.

शेतकऱ्याचा मालाला भाव मिळाला नाही म्हणून शेतकरी हवालदिल झाला आहे आणि पैशाची गरज असल्यामुळे जनावरे विकून गरज भागविण्यासाठी गडचांदूर ला शेतकरी जनावरे घेऊन येत आहेत आणि इथे वाहतूक पोलिस विनाकारण शेतकऱ्यांन कडून वसुली करण्यात तरबेज दिसत आहे अशी चर्चा खुलेआम सुरू आहे. असून सध्या लगीन सराय सुरू आसल्यामुळे वाहतूकही वाढली असून वाहतूक पोलिसाची बल्ले-बल्ले झाली आहे, वाहतूक पोलिसाची मनमानी कारभार वरिष्ठांच्या आशीर्वादाने वाहतूकदारांन कडून अवैध वसुली जोमात अशी चर्चा गडचांदूर शहरात जोमात सुरू आहे. गडचांदूर वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार का? अशी मागणी केली जात आहे.