सचिन सुर्यवंशी यांना ” विभागीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार ” प्रदान !…

33

✒️प्रतिनिधी धरणगाव(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.16मे):-महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ, धुळे जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ व ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था आयोजित “विभागीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळा” आज धुळे येथील प्रा रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा रवींद्र निकम तर प्रमुख अतिथी म्हणून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडासंचालक डॉ दिनेश पाटील, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कुलचे चेअरमन श्री कैलास जैन, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष तथा आयोजक आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू डॉ आनंद पवार, विभागीय जीवनगौरव पुरस्कार्थी डॉ विजय पाटील नवापूर, राज्य खो-खो असोसिएशनचे सहसचिव डॉ राजेश सोनवणे यांची उपस्थिती होती यात जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडाशिक्षकांना “आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले.

यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील सारजाई कुडे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री सचिन सूर्यवंशी सर यांना सन्मानित करण्यात आला सचिन सूर्यवंशी यांचे धरणगाव शहरातील सामाजिक शैक्षणिक राजकिय व विद्यार्थी वर्ग कडून शुभेच्छा देण्यात येत आहे.